mla yashwant mane, dcm ajit pawar, ujani dam, pandharpur news saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : दादा, काही तरी करा... सोलापूर जिल्ह्यातील 40 साखर कारखाने अडचणीत येतील, अजित पवारांपुढे आमदार यशवंत मानेंची व्यथा

ujani dam : पावसाच्या प्रतिक्षेत आणखी दिवस काढायचे असे शेतकरी म्हणून लागले आहेत.

भारत नागणे

Pandharpur News : सोलापूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेली ऊसासह केळी, डाळिंब, तूर,बाजरी,मका अशी विविध पिके जळू लागली आहेत. (Maharashtra News)

पिके वाचवण्यासाठी उजनी धरणातून (ujani dam) उजवा आणि डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी आमदार यशवंत माने (mla yashwant mane) यांनी केली आहे. आमदार माने यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे.

साम टीव्हीशी बाेलताना आमदार यशवंत माने म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्ही नुकतीच भेट घेतली. त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील सध्याच्या पाणी टंचाई विषयी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात अधिका-यांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान लवकरच पाणी सोडले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे पिके वाचतील अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील 40 साखर कारखाने अडचणीत येण्याची भिती देखील आमदार माने यांनी यावेळी व्यक्त आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT