MLA Vijay Shivtare assures full financial support for farmer’s daughter’s wedding after rains destroyed crops. saam tv
महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Vijay Shivtare To Bear Farmers Daughter Wedding Expenses: मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशाच एका संकटात सापडलेल्या यवतमाळच्या शेतकऱ्याच्या मदतीला आमदार विजय शिवतारे धावून आलेत.

Bharat Jadhav

  • मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • यवतमाळच्या मुस्ताक सय्यद यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचा नाश झाला.

  • शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक संकट निर्माण झाले होते.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

गेले काही दिवस पडत असलेल्या पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याची व्यथा साम टीव्हीने दाखवली होती. शेतकऱ्यांची व्यथा पाहून आमदार विजय शिवतारे मुस्ताक सय्यद यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च उचलणार आहेत. राज्यामध्ये गेले काही दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय. या पावसामुळे मराठवाड्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक नद्यांना पूर आल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मुस्ताक सय्यद यांच्या शेतालाही अतिवृष्टीचा फटका बसलाय.

मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पिकाची नासाडी झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने लग्नाचा आर्थिक भार कसा सोसायचा या विचाराने त्यांना अश्रू अनावर झाले. मुस्ताद सय्यद यांची कैफियत साम टीव्हीने दाखवल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे आमदार माजी मंत्री मदतीसाठी सरसावले आहेत. आमदार विजय शिवतारे यांनी मुस्ताक सय्यद यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाचा सर्व खर्च मी करणार असल्याचे सांगितले.

याचसोबत डिसेंबरपासून ते एप्रिलपर्यंत मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळा करून देणार असल्याचं ते म्हणालेत. यासाठी कितीही खर्च येऊ द्या आपण तयार असल्याचं विजय शिवतारे म्हणालेत. मित्र मंडळ आणि शिवसेना यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवणार असल्याचं शिवतारे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT