Sagar Dhas Vehicle Collides Two Wheeler Saam Tv News
महाराष्ट्र

Accident News : मोठी बातमी! आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Sagar Dhas Vehicle Collides Two Wheeler : बीडमधील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला धडक दिलीय. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश शेळके असं अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे.

Prashant Patil

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर आलीय, अहिल्यानगर- पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बीडमधील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला धडक दिलीय. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश शेळके असं अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस यांनी त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या दुर्घेटनेबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर धस हे रात्री आष्टीवरून पुण्याच्या दिशेला निघाले होते. सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला. रस्त्याने जात असताना सागर धस यांच्या गाडीने शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जात आहे. या धडकेनंतर दुचाकीचे आणि सागर धस यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर नितीन शेळके यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ही गाडी आमदार सुरेश धस यांचा मुलगाच चालवत होता की, अजून कोणी याबद्दल माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, सागर धसच गाडी चालवत असल्याची एक चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT