satara, patan , shambhuraj desai , aaditya thackeray, harshal kadam. shivsena saam tv
महाराष्ट्र

Satara : एनसीपीचे कार्यकर्ते सर्वांनी पाहिले : शंभुराज; शंभुराजंना पोटशुळ उठलाय : हर्षल कदम (व्हिडिओ पाहा)

गेल्या दाेन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट एकमेकांवर टीका करीत आहेत.

ओंकार कदम

सातारा : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची निष्ठा यात्रा म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेसनं (NCP) पुरस्कृत केलेली यात्रा असल्याची टीका राज्याचे माजी गृहमंत्री आमदार शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) केली. आमदार देसाईंच्या टीकेस शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षद कदम (Harshal Kadam) यांनी प्रत्युत्तर देत शिवसेनेची (Shivsena) आणि विशेषत: आदित्य ठाकरे यांना आशिर्वाद देण्यासाठी (Patan) आलेली गर्दी बघुन शंभुराज यांना पोटशुळ उठलाय असे म्हटलं आहे. (Satara Latest Marathi News)

सातारा (Satara) जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा संपन्न झाली. या यात्रेस शिवसैनिकांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेती. या सभेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांनी पुन्हा राजीनामा देऊन मैदानात यावे असं आव्हान दिलं. (Aaditya Thackeray Latest Marathi News)

आमदार शंभूराज देसाई (शिंदे गट) यांच्या मतदारसंघात झालेल्या निष्ठा रॅलीबाबत आमदार देसाई म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ठाकरेंची निष्ठा यात्रा हाेती. आमदार देसाईंनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या यात्रेस राष्ट्रवादीची साथ असल्याची टिप्पणी केली. त्यानंतर देसाईंवर देखील सेनेतून पलटवार करण्यात आला. (Shambhuraj Desai News)

शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम (Harshal Kadam) म्हणाले पाटण तालुक्यातील गर्दी बघुन आता शंभुराजे यांना पोटशुळ उठलाय. या निष्ठा यात्रेत हजाराेंच्या संख्येने सहभागी झालेले शिवसैनिक हे केवळ आणि केवळ ठाकरे परिवारावर असलेल्या प्रेमामुळं जमले हाेते. आगामी काळात सातारा जिल्ह्यात शिवसेना (Shivsena News) आणखी बळकट हाेईल असेही कदम यांनी नमूद केलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT