रत्नागिरी : राज्याचे (maharashtra) माजी तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर मंगळवारी पुण्यात (pune) दगडफेक झाली. हा हल्ला कटरचून केल्याचा आराेप आमदार उदय सामंत यांनी केला आहे. दरम्यान या हल्ल्याचा निषेध आज (बुधवार) रत्नागिरीत (Ratnagri) सामंत समर्थकांनी नाेंदविण्यास प्रारंभ केला आहे. शेकडाे समर्थक रस्त्यावर उतरले असून हल्लखाेरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करीत आहेत. (Uday Samant Latest Marathi News)
युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची मंगळवारी कात्रज येथे सभा झाल्यानंतर संपल्यानंतर कांही अंतरावर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर दगडफेक झाली. त्यानंतर हल्लेखाेरांना तातडीने अटक झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया सामंत समर्थकांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातून उमटल्या. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)
आज आमदार उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रत्नागिरी शहरात सामंत समर्थकांनी निषेध केला. पुण्यात हल्ला झाल्यानंतर सामंत समर्थकांनी सकाळी बॅनरद्वारे हल्ल्याचा निषेध केला होता. त्यानंतर सामंत समर्थक आमदार उदय सामंत यांच्या कार्यालयात जमले. ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर कठाेर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी समर्थकांनी केली. यावेळी बिपीन बंदरकर, स्मितल पावसकर, कांचन नागवेकर यांच्यासह सामंत समर्थकांनी आमचा संयम संपला आहे असे म्हटलं. तसेच भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध नाेंदविताे असे नमूद केले. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत हल्ल्याचा निषेध नाेंदविला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.