MLA Santosh Bangar Viral Video
MLA Santosh Bangar Viral Video  Saam TV
महाराष्ट्र

Santosh Bangar News: आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच; थेट प्राचार्यांना केली मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

संदीप नागरे

MLA Santosh Bangar's Viral Video : शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, संतोष बांगर यांचा पुन्हा एकदा मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता तर बांगर यांनी थेट हिंगोलीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यालाच मारहाण केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. (Latest Marathi News)

डॉक्टर अशोक उपाध्याय असे आमदार बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्याचे नाव आहे. उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (Collage) प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना १८ जानेवारीला घडली असल्याचं सांगितलं जातंय.

आमदार बांगर हे प्राचार्य उपाध्याय यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ (Viral Video)आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मागील वर्षभरात आमदार संतोष बांगर यांनी अनेक अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारांना मारहाण केली आहे आणि आता थेट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

या घटनेनंतर आमदार बांगर यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे. आमदार संतोष बांगर यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून त्यांना कायद्याचे कुठलेही भान राहिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

J P Nadda : भाजप आता स्वत:च स्वत:ला चालवू शकतो; RSSच्या प्रश्नावर जे.पी.नड्डा यांचं वक्तव्य

Sonalee Kulkarni : पत्रकार ते अभिनेत्री; सिनेसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा इंडस्ट्रीतील थक्क करणारा प्रवास

Gurucharan Sinh News | तारक मेहता फेम अभिनेते गुरुचरण सिंह परतले

Health Tips Water : तहान नसतानाही पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी घातक

Mulund BJP News | पैसे वाटल्याचा आरोप, भाजप आणि ठाकरे गटाचा राडा

SCROLL FOR NEXT