Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

MLA Sandip Joshi : "आमदार जोशींसोबत माझी ओळख... " आमदारांच्या नावाखाली नोकरीचं आमिष दाखवत लाखोंचा गंडा

Nagpur News : नागपूरमध्ये आमदार संदीप जोशी यांच्या नावाचा गैरवापर करून साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आली. नोकरीचे आमिष दाखवून घेतलेल्या रकमेसाठी पोलिस तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Alisha Khedekar

  • नागपूरमध्ये आमदारांच्या नावाने साडेचार लाखांची फसवणूक.

  • नोकरीचे आमिष दाखवून आरोपीने घेतली मोठी रक्कम.

  • तक्रारदाराने थेट आमदारांकडे धाव घेत प्रकरण मांडले.

  • पोलिस तपास सुरू, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी.

पराग ढोबळे ( नागपूर )

नागपूरमध्ये आमदाराच्या नावाचा गैरवापर करून साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित व्यक्तीने ही बाब लक्षात आल्यानंतर थेट आमदार संदीप जोशी यांच्याकडे धाव घेऊन तक्रार केली. आमदारांशी आपली जवळची ओळख असल्याचे भासवून पत्नीला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठी रक्कम घेतली गेल्याचे या तक्रारीत नमूद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश खोडतकर असे तक्रारदाराचे नाव असून, त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीत अभय घोडवैद्य नावाच्या व्यक्तीने आमदार संदीप जोशी यांच्या नावाचा वापर करून आपली फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. घोडवैद्यने खोडतकर यांना सांगितले की, "आमदार जोशी यांच्याशी माझी चांगली ओळख आहे, त्यांच्या मदतीने तुझ्या पत्नीला चांगली नोकरी मिळवून देतो." या आश्वासनावर विश्वास ठेवून खोडतकर यांनी त्याला तब्बल साडेचार लाख रुपये दिले.

काही दिवसांनी नोकरीसंबंधी कोणतीही हालचाल न झाल्याने खोडतकर यांनी वारंवार घोडवैद्यकडे रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र, तो टाळाटाळ करू लागला आणि अखेर पैसे परत करण्यास नकार दिला. परिस्थिती पाहता खोडतकर यांनी थेट आमदार संदीप जोशी यांच्याकडे जाऊन संपूर्ण प्रकार मांडला.

आमदार जोशी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ पोलिसांच्या गुन्हेशाखेला पत्र पाठवून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. "माझ्या नावाचा वापर करून कोणी फसवणूक करत असेल, तर त्याला कोणतीही पाठीशी मिळणार नाही. अशा प्रकारच्या फसवणुकीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे," असे आमदार जोशी यांनी स्पष्ट केले.

सध्या पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, अभय घोडवैद्य याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकार केवळ एका व्यक्तीची फसवणूक नसून, लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांचा विश्वासघात करण्याचे गंभीर उदाहरण आहे. यामुळे शहरात संतापाची लाट पसरली असून, पोलिसांकडून आरोपीविरुद्ध जलद व कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT