Students face police action during protest at Jantar Mantar as political controversy intensifies over “terrorist” remark. saam tv
महाराष्ट्र

दिल्लीतील आंदोलक आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचं डोकं ठिकाणावर आहे का?

MLA Sadabhau Khot Sparks Outrage After Calling Student Protesters Terrorists: सत्ताधारी आमदारानं आता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट दहशतवादी ठरवलयं... त्यामुळे शैक्षणिक हक्कासाठी लाठ्या- काठ्या खाणारे आंदोलक दहशतवादी कसे असा सवाल उपस्थित होतोय? त्यामुळे खोतांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल विरोधक विचारतायत... नेमकं प्रकरण काय? पाहूयात या रिपोर्टमधून....

Suprim Maskar

लोकशाही देशात जंतर मंतरवर शैक्षणिक हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ठोकशाही मार्गानं पोलिसांनी लाठीचार्ज केला...तरुण- तरुणींवर इथल्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशानं नोकरदार अधिकाऱ्यांनी बेफाम लाठ्या काठ्या चालवल्या...तरुणांनीही लाठ्या काठ्यांचा मार झेलत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा घेतला...मात्र आता सत्ताधारी आमदार निर्लज्जपणे विद्यार्थ्यांना थेट आतंकवादी म्हणतायत... सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना थेट 'आतंकवादी' म्हटलं...खोत इतकचं बोलून थांबले नाही तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणमंत्री म्हणून धर्मेंद्रचं राहणार... असं खोतांनी ठासून सांगितलं...

दरम्यान सदाभाऊ खोतांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा दिल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झाले... सत्तेत मशगूल झाल्यानं तुमचे विचार लुळे पांगळे झाल्याची टीका काँग्रेसनं केलीय...दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या नागपूरच्या भारत बाणाईत या तरुणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला...भारतच्या आक्रोशाचे व्हिडिओ व्हायरल झाले... त्यामुळे आमचा मुलगा आतंकवादी नाही तो हक्कासाठी लढतोय, असा संताप भारतच्या वडिलांनी व्य़क्त केलाय...

एसटी कर्मचारी आंदोलन, शेतकरी हमीभाव आंदोलनात सदाभाऊ खोतांनी अनेक वेळा रस्त्यावरची लढाई लढलीय...मात्र सत्ताधारी बाकावर जाताच सदाभाऊ आंदोलनाची भाषा विसरले आणि थेट आंदोलकांनाच दहशतवादी ठरवलं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखलेला जंतर-मंतरचा रस्ता आणि दुसरीकडे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी राजकीय विधानांमुळे सदाभाऊंचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT