'अमरावती हिंसाचार पूर्वनियोजित? पालकमंत्र्यांनी खुलासा करावा, अन्यथा...' SaamTv
महाराष्ट्र

'अमरावती हिंसाचार पूर्वनियोजित? पालकमंत्र्यांनी खुलासा करावा, अन्यथा...'

हे लोकांसमोर आना,अन्यथा हे घडविन्या मागे तुमचाही कुठे तरी हात आहे असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

अरुण जोशी

अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार ही पूर्वनियोजित होती असा रिपोर्ट सायबर विभागाने अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे दिल्यानंतर तो पूर्वनियोजित कसा होता याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, अशी मागणी अमरावती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली आहे. सरकार तुमच आहे, पोलीस विभाग तुमचा आहे जर हे सर्व पूर्वनियोजित होत तर तेव्हा एवढा मोठा मोर्चा का काढू दिला? दुसऱ्या दिवशी जो गोंधळ झाला तो जर पूर्वनियोजित होता तर तुमच्याकडे पोलीस विभाग असताना मग तुम्ही थांबला का नाही? तुम्ही काय कारवाई केली? हे कोणाचं कारस्थान आहे? हे लोकांसमोर आना,अन्यथा हे घडविन्या मागे तुमचाही कुठे तरी हात आहे असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान त्रिपुरा घटनेचे पडसाद महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये उमटले. अमरावती, मालेगावमध्येही काही प्रमाणात हिंसाचार झाला. मात्र सुदैवानं पोलीस आणि प्रशासनानं वेळीचं खबरदारी घेतल्यानं परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीचं शहरात शांतता प्रस्थापित करण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला. मात्र हिंसाचाराच्या घटनेच्या मुळाशी गेल्यावर पोलीस तपासात आता अतिशय गंभीर बाबी समोर येता आहेत. हिंसाचारादरम्यान जमावाला चिथावणीखोर घोषणा देऊन भडकवण्यात आल्याचं तपासात समोर आलं असून हे सर्व पुरावे पोलिसांकडून कोर्टात सादर केले जाणार आहेत. आता आमदार रवी राणा यांनी तर तेथ पालकमंत्र्यांना टारगेट करत काही प्रश्न विचारले आहे.

नांदेडमध्ये अचानक उसळलेल्या हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी अशा घटनेची पेरणी केली गेली होती, का याचाही आता तपास सुरू आहे. रझा अकादमीकडून बंदची हाक, मोर्चा त्यानंतर हिंसाचार आणि पुन्हा प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून लगेच आंदोलनाची हाक, ही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT