Ranjit Kamble News  Saam tv
महाराष्ट्र

Ranjit Kamble : दुमदुमली भिर्रर्र...ची आरोळी, फिटले पट शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे; आमदार रणजित कांबळे बनले कातकर!

शंकरपटाचे उदघाटन आमदार रणजित कांबळे व खासदार रामदास तडस यांच्या हस्ते पार पडले

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Ranjit Kamble News : सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठल्यानंतर नागरिकांचा उत्साह आता पाहण्यासारखा आहे. देवळी तालुक्यातील नाचणगाव येथेही सिद्धेश्वर कृषक मंचच्या वतीने भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज या शंकरपटाचे उदघाटन आमदार रणजित कांबळे व खासदार रामदास तडस यांच्या हस्ते पार पडले.यावेळी देवळी पुलगावचे आमदार रणजित कांबळे यांनी बैलांचा शेकडा हाकलून शेतकऱ्यांचा (Farmers) उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

आमदार रणजित कांबळे (Ranjit Kamble) यांनी शंकरपटाच्या उद्घाटनावेळी शेकडा हाकलण्याचा आनंद लुटला. बैलगाडी हाकणे आणि शेकडा हाकलणं यात फरक असतो. शेकड्याला जुंपलेले बैल तुफान असतात. पटाचे बैल असल्यानं ते सैराट सुटतात.

शेकडा हाकलण्यासाठी मजबूत बांध्याचे कातकर हवेत. कातकर होण्यासाठी हिंमत लागते. ही हिंमत आमदार कांबळे यांनी दाखविली. उद्घाटनावेळी त्यांनी शेकडा हाकलला. उपस्थित लोकं हे सारं पाहत होते. यावेळी खासदार रामदास तडस सुद्धा उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱ्या या शंकरपटात मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यावर शर्यतीसाठी अनेक नियम बनविण्यात आले आहे. आयोजकांनी नियमांच्या आधीन राहून उत्साहात हा कार्यक्रम घ्यावा.

शंकर पट म्हणजे बळीराजा चा म्हणजेच आपल्या जगाच्या पोशिंद्याचा खेळ आहे.जेव्हा बंदी होती तेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले होते कारण बंदी असल्याने या बैलांना पोसण्यात खूप खर्च होत होता आणि बैलांची किंमत कमी होत होती आता सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे असं खासदार रामदास तडस म्हणाले.

नाचणगाव येथे पटाचे मैदान दोन दिवस सळसळत्या उत्साहात कार्यक्रम होत आहे . पट शौकिनांच्या उपस्थितीत उदघाटन पार पडले असून पटाच्या दाणीवर आठ वर्षांनी वाऱ्याच्या वेगाचा थरार अनुभवत भिर्रर्रर्र.. ची आरोळी आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

मराठमोळ्या अधिकाऱ्याचं 'पुढचं पाऊल'! IRTS अधिकारी सुशील गायकवाड महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तपदी, पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT