अहमदनगर ः राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर टीकास्त्र डागले होते. त्यांच्या कामाचाही जाब विचारला होता. इतका निधी आणला मग गेला कुठे. तुम्हाला सल्लागार बदलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले होते. ढाकणे यांच्या टीकेला आमदार राजळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तु्म्ह एक कोविड सेंटर सुरू केलं, त्याचाच गावभर प्रचार करता. तुम्हाला कारखान्याशेजारचा रस्ता करता आला नाही. बाकीचं कशाला सांगता. मी केलेला विकास पाहायचा असेल तर दोन्ही तालुक्यात फिरून दाखवते. साडेचार वर्षे झोप काढायची आणि निवडणुका जवळ आल्या की जागे व्हायचे, अशा शब्दांत आमदार राजळे यांनी घणाघाती टीका केली.MLA Rajale's challenge to Pratap Dhakne
रस्त्याच्या कामाच्या शुभारंभावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बाबाजी बोरसे होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, धनंजय बडे, सोमनाथ खेडकर, अंकुश चितळे, सुनील ओव्हळ, बोरसेवाडीच्या सरपंच संजना बोरसे, राजेंद्र बोरसे, रावसाहेब मोरे, रंजना बोरसे उपस्थित होते.
राजळे म्हणाल्या, ‘‘मतदारसंघात विकासकामे करताना जनतेची गरज कोणती, याला प्राधान्य दिले जाते. गावाची लोकसंख्या किती, आपल्याला किती मते मिळाली, याचा विचार कधीच केला नाही. त्यामुळेच सोनाळवाडी, काकडदरा सारख्या तीनशे ते चारशे लोखसंख्या असलेल्या दुर्गम गावाला दीड ते दोन कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करून मुख्य रस्त्यांना जोडले आहे, याचे समाधान वाटते. गेल्या पाच वर्षांत केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळी पंकजा मुंडे ग्रामविकासमंत्री असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व जलयुक्तशिवार योजना सुरू केली. त्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक गावांत रस्ते व बंधाऱ्यांची मोठी कामे झाली. पाणीसाठा वाढला असून, सध्या पाऊस लांबला, तरी एकही टँकर सुरू करण्याची वेळ आली नाही.’’ MLA Rajale's challenge to Pratap Dhakne
‘‘मी सहा-सात वर्षांपासून कोणावरही टीका न करता काम करण्याला प्राधान्य दिले. ज्यांनी मला पदावर बसवले त्यांचाच मी विचार करते. इतरांचा विचार मी करत नाही. मी कधी कोणावर टीका केली नाही. तुम्ही मात्र कोविड सेंटर उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह माझ्यावर टीका केली. आज सुरू केलेली कामे मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. सूत्रसंचालन प्रास्ताविक बाळासाहेब सोनाळे यांनी केले.
महाविकास आघाडी सरकाराने कोरोनाची भीती दाखवून अनेक योजना बंद केल्या. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चाळीस हजार किलोमीटर रस्ते करू, असे सांगितले. अद्याप एकाही रस्त्याचा आराखडा, सर्वेक्षण, प्रस्ताव मंजुरीही नाही, अशी टीका आमदार राजळे यांनी राज्य सरकारवर केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.