Nitin Deshmukh
Nitin Deshmukh saam tv
महाराष्ट्र

Nitin Deshmukh on CM Shinde : सत्तेत बसलेत यांना लाज वाटली पाहिजे; आमदार नितीन देशमुखांची शिंदे-फडणवीसांवर टीका

दीपक क्षीरसागर

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  अयोध्या दौऱ्यावर असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. एकीकडे राज्यात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी चिंतीत आहे. तर राज्याचा कारभार पाहणारे मंत्री अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. एकीकडे राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असताना दुसरीकडे सत्ताधारी अयोध्या दौऱ्यावर गेले, यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दात आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

देवेंद्रजी अकोल्याचे पालकमंत्री आहेत. मागच्या वर्षीही या जिल्ह्यात गारपिट झाली. दोन दिवसांपासून पुन्हा जिल्ह्यात गारपीट सुरु आहे. एकही मंत्री इथे फिरकला नाही. सत्तेत बसलेत हे यांना लाज वाटली पाहिजे. (Breaking Marathi News)

कसलं राजकारण करत आहेत हे? राम राम म्हणून मतं मागता. पण तुमच्या राम राज्यातील शेतकरी किती अडचणीत आहे. हिंदू म्हणवून घेणाऱ्यांनी हिंदूनाच वाऱ्यावर सोडलं. या सत्ताधाऱ्यांचा सर्वात जास्त त्रास हा हिंदूनाच आहे, असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe : सोप्या पद्धतीनं बनवा सर्वांचा आवडता रवा ढोकळा

Shiv Sena vs BJP : नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान नसतील, ते झोला घेऊन हिमालयात जातील; शिवसेना ठाकरे गटाची टीका

Chardham Yatra 2024: भाविकांसाठी मोठी बातमी! अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात; केदारनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले

10th Exam Fess: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ, आता किती फी भरावी लागणार?

Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल; मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा?

SCROLL FOR NEXT