raju patil  saam tv
महाराष्ट्र

एकमेकांची पापे कशाला धुता ? त्यापेक्षा...; मनसे आमदार राजू पाटलांचा शिंदे गटावर निशाणा

'लोकांची कामे करून पुण्य कमवा, लोकांचे आशीर्वाद तुम्हाला पुढे कामाला येतील, अशा शब्दात आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

प्रदीप भणगे

Raju patil News : डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे कायम आहेत. यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यावरून भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. त्यातच या राजकीय कलहात मनसेने उडी घेतली आहे. या कलहात मनसे आमदार राजू पाटील यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांची बाजू घेत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'लोकांची कामे करून पुण्य कमवा, लोकांचे आशीर्वाद तुम्हाला पुढे कामाला येतील, अशा शब्दात आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

रविवारी सकाळी झालेल्या एका खासगी शाळेच्या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खड्डेमय रस्त्यावर बोलताना नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. या राजकीय आरोप-प्रत्यारोपात मनसे आमदार राजू पाटील यांनी उडी घेतली आहे.

मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, 'मी रविंद्र चव्हाण यांची वकीली करत नाही. रविंद्र चव्हाण जे बोलते त्याचं मी समर्थन करतो आणि आता आपण नशिबाचा तो फेरा उलटा फिरत होता. आता आपल्यावर उलटा न फिरता कुठेतरी सत्तेत चांगले वरची खुर्ची उपभोगता येते. तर एकमेकांची पापे कशाला धुता ? त्यापेक्षा लोकांची कामे करून पुण्य कमवा. लोकांचे आशीर्वाद तुम्हाला पुढे कामाला येतील'.

शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे काय म्हणाले होते ?

शिंदे गटातील नेते दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. 'रविंद्र चव्हाण, तुम्ही विकास कामे करण्यास कमी पडला असून स्वतःची पापे झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप -प्रत्यारोप करू नका. फडणवीस आणि शिंदे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. झारीतल्या शुक्राचार्यांनी आरोप करू नये. आरोप करण्यापेक्षा कामे करा.गेली दोन वर्षे तर आमदारांनी आरोप करण्यातच दिवस घालवले आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT