satara, sharad pawar, ajit pawar, maharashtra politics saam tv
महाराष्ट्र

After Ajit Pawar Rebel's: दिवसभर शरद पवारांसमवेत राहिल्यानंतर मकरंद पाटलांनी साेडलं माैन

Sharad Pawar In Satara : आज दिवसभर शरद पवार हे सातारा दाै-यावर हाेते.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Mla Makrand Patil News : पक्षाचा अध्यक्षामध्ये आत्मविश्वास असला तर कार्यकर्त्यांना देखील हुरुप येताे असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नमूद करीत राष्ट्रवादीत तरुणांना नाउमेद केले जात नाही असेही पवार यांनी म्हटलं. दरम्यान रविवारी अजित पवार (Ajit pawar latest news) यांच्यासमवेत असलेले वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी आज शरद पवारांसाेबत सातारा जिल्हा दाै-यातील सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली. (Maharashtra News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे सातारा जिल्ह्यात एनसीपीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी जाेरदार स्वागत केले. अजित पवार यांच्या बंडानंतर एनसीपी अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळास भेट देण्यासाठी तसेच श्री. चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी आले हाेते.

सातारा जिल्ह्यात पवार हे प्रवेश करत असतानाच त्यांच्या कारच्या भाेवती शिंदेवाडी (ता.खंडाळा ) येथे कार्यकर्त्यांनी माेठा गराडा घाडला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुष्पहार देत स्वागत केले. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून आमदार मकरंद पाटील यांनी वाट काढत पवार यांनी पुष्पगुच्छ दिला. त्यावेळी पवार यांच्यासमवेत कारमध्ये आमदार राेहित पवार (Rohit Pawar) हे देखील हाेते.

यावेळी ज्येष्ठ नेते पवार यांनी मकरंद पाटील यांना त्यांच्या स्वत:च्या कारमध्ये घेतले. पवार यांच्या या कृतीने कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. देश का नेता कैसा हाे ? शरद पवार जैसा हाे...शरद पवार आगे बढाे हमी तुम्हारे साथ है अशा घाेषणांनी परिसर दणाणून साेडला.

मकरंद आबांनी साेडले माैन

दरम्यान साम टीव्हीने आमदार मकरंद पाटील यांना आपण काल उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar Politics) यांनी शपथविधी साेहळ्यास उपस्थित हाेता असं विचारले असता आपण आपल्या कारखान्याच्या कामासाठी गेलो हाेताे असे आमदार पाटील यांनी सांगितले.

तुम्हाला माहिती नव्हत का, तुमची भूमिका काय ? यावर आमदार पाटील यांनी फारसे बाेलणे पसंत केले नाही आणि पुढच्या त्यांच्या नियाेजीत कार्यक्रमांसाठी निघून गेले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav: युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर २५ राउंड गोळीबार; दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या, पोलिसांचा तपास सुरु

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT