Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP
Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'वेळ आली की ठाण्याची दाढी कार्यक्रम करते' (व्हिडिओ पाहा)

ओंकार कदम

सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध पक्षातील नेते या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगत आहे. त्यामुळे दरराेज काेण कूठल्या पक्षात जाईल याचा अंदाज कुणालाच येत नाहीये. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) हे भाजपच्या (bjp) वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर आमदार महेश शिंदे (mahesh shinde) यांनी माध्यमांच्या प्रश्नावर आता खळ उठलय वस्ती उठायला जास्त वेळ लागणार नाही अशी टिप्पणी केली. (Mahesh Shinde Latest Marathi News)

कोरेगाव विधानसभा मतदासंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते साेमवारी (ता.25 जूलै) कोरेगाव येथील पंप हाऊसच्या रखडलेल्या फिल्ट्रेशन प्लॅन्टचा लोकार्पण सोहळा झाला. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी आमदार महेश शिंदे यांना विचारलेल्या प्रश्नांवर जोरदार बॅटिंग केली.

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावर सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रश्नास उत्तर देताना आमदार महेश शिंदे म्हणाले आता खळ उठलय वस्ती उठायला जास्त वेळ लागणार नाही. परवा खळ उठवलं आहे आता बोजा बिस्तरा गुंडाळायला आता वेळ लागणार नाही असा टोलाही आमदार महेश शिंदे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीतून कोणी शिंदे गट (Eknath Shinde) किंवा भाजप बरोबर जाईल असे वाटते का ? यावर आमदार महेश शिंदे म्हणाले सध्या आमच्याकडे मोठी लाईन आहे. त्यामुळे सब कतार मे है. ठाण्याची दाढी आहे ना ती योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम करते असे ते मुख्यमंत्री आहेत असेही शिंदेंनी नमूद केले. त्यामुळे ज्यांना दादागिरी पासून मुक्तता पाहिजे ज्यांना खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे अशा सगळ्यांना मुख्यमंत्री बरोबर घेतील असेही नाव न घेता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर आमदार महेश शिंदेंनी टीका केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT