Alibaug MLA Accident  Saamtv
महाराष्ट्र

Alibaug MLA Accident : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात

mla mahendra dalvi car accident News : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सचिन कदम, रायगड

mla mahendra dalvi car accident :

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरुप आहेत. पण या अपघातात एका मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. आमदार महेंद्र दळवी यांच्या कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. जासीम अब्दुल रहेमान पासवारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रायगडच्या मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार महेंद्र दळवी आगरदांडा येथे कार्यक्रमासाठी जात होते. या कार्यक्रमासाठी जात असताना आमदार दळवी यांच्या कारला अपघात झाला. या अपघातातील जासीम अब्दुल रहेमान पासवारे यांच्या मृत्यूबाबत आमदार दळवी यांनी दु:ख व्यक्त केलं.

आमदार महेंद्र दळवी किरकोळ जखमी

शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला रायगड जिल्ह्यामधील उसडी गावातील टोल नाक्याजवळील तळारोड जवळ अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने आमदार महेंद्र दळवी यांच्या धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. तर आमदार महेंद्र दळवी किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वाराला रुग्णालयात हलविण्यात आलं. तर महेंद्र दळवी यांनाही रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी या अपघात प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.

भंडाऱ्यात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची भिंतीला धडक

भंडारा शहरातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाका या रस्त्यावर नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. भरधाव कारने एका दुकानाच्या भिंतीला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कार भरधाव वेगात असल्याने भिंतीला खड्डा पडला आहे. यासोबतच कारचा पुढचा भाग तुटून कारच्या एअर बॅग देखील उघडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT