Arjun Khotkar vs Kailas Gorantyal
Arjun Khotkar vs Kailas Gorantyal  Saam TV
महाराष्ट्र

Jalna News : आमदार गोरंट्याल यांचा खोतकर, झोल कुटुंबीयांवर गंभीर आरोप; थेट मोक्का लावण्याची केली मागणी

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : शिंदे गटात प्रवेश केल्यानं काही जणांना चरबी चढली आहे. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील किरण खरात यांची सुपारी दिली आहे. खोतकर यांची जालन्याचा बिहार करायची तयारी आहे, अशी टीका काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर आणि झोल कुटुंबीयांवर केली. इतकंच नाही तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, मोक्का लावा, अशी मागणी सुद्धा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं गोरंट्याल म्हणाले. (Latest Marathi News)

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज जालन्यात (Jalna) पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी खोत आणि झोल कुटुंबीयांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. क्रिप्टो करन्सी आणि आर्थिक देवाण घेवाणीतून जालन्यातील मंगरूळ येथील किरण खरात यांना मारहाण करण्यात आली असून गजानन तौर यांच्यासह आणखी काही गुंडानी त्यांचं अपहरण करून टॉर्चर केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी विजय झोल यांच्यासह अपहरण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणीही गोरंटयाल यांनी केली.

दोन दिवसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आपण भेटणार असून अर्जुन खोतकर हा तुमच्या नावाने जालन्यात नांगनाच करून लोकांना त्रास देत असल्याची तक्रार करणार असल्याचं गोरंटयाल यांनी म्हटलं आहे. व्यवहारातून हा प्रकार झाला असून व्यवहारात फायदा झाला की, मजा करायची आणि तोटा झाला की लोकांना मारायचं असं योग्य नाही असं सांगत किरण खरात यांच्या विरोधात तुम्हांला पोलिसांत देखील तक्रार करता येत होती असं सांगायलाही गोरंटयाल विसरले नाहीत.  (Maharashtra Political News)

किरण खरात याचं दोन वेळा अपहरण करण्यात आलं असून पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचे दोन गुन्हे दाखल करावे अशी मागणीही गोरंटयाल यांनी केली.आरोपींनी किरण खरात याच्या घरी जाऊन केलेल्या टॉर्चरचे व्हिडीओ देखील गोरंटयाल यांनी पत्रकारांना दिले आहेत. दरम्यान, गोरंट्याल यांच्या या आरोपानंतर झोल आणि खोतकर कुटुंबीयांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharayu Sonawane : साध्या सिंपल पारूचा वेस्टर्न अंदाज पाहिलात का ?

Today's Marathi News Live : लोकल ट्रेनमध्ये नशेखोर तरुणांच्या हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू

Hingoli News : निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला; महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राचार्यावर गुन्हा दाखल

Raashii Khanna : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

SRH vs RR, IPL 2024: हैदराबाद- राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

SCROLL FOR NEXT