Jayant Patil Saam tv
महाराष्ट्र

काटा उलटा फिरायलाय, जयंत पाटील थोड्याच दिवसात भाजपात, सत्ताधारी आमदाराचा मोठा दावा

Jayant Patil reaction to BJP entry claim : जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या सत्ताधारी आमदाराच्या दाव्यामुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्याला जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून राष्ट्रवादीतील हालचालींवर लक्ष केंद्रीत झालं आहे.

Namdeo Kumbhar

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

NCP Sharad Pawar faction updates : राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते जयंत पाटील भाजपात येणार असल्याचा दावा सत्ताधारी आमदाराकडून करण्यात आलाय. यामुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणावर चर्चा सुरू असतानाच आता थेट जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे विधान सत्ताधारी आमदाराकडून करण्यात आले. या विधानाला जयंत पाटील यांनी खोडून काढलेय.

सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील काही दिवसात भाजपमध्ये येतील, असा दावा केला. ते सांगलीत बोलत होते. जयंत पाटलांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. १० पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे.. आणि मला म्हणतोय भाजपमध्ये जाणार, असे विधान जयंत पाटील यांनी केलेय. सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे.

आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्याच दिवसात ते भाजपात येतील, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले होते. यावर जयंत पाटील यांनी प्रति उत्तर दिले आहे. दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे.. आणि मला म्हणतोय भाजप मध्ये जाणार, असे जयंत पाटील म्हणाले.

आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत..थोडया दिवसात ते भाजपात येतील, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले. भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही, ते बघावे, कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही.. कधी उडी मारायचे, ते बघायला लागले आहे.. असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.. सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. १० पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे.. आणि मला म्हणतोय भाजपमध्ये जाणार, असे म्हणत जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KBC 18: 'ट्रेनिंगमध्ये साप खावे लागतात...'; CRPF कमांडेंटचा बिग बॉसमध्ये मोठा खुलासा

Maharashtra News Live Update: पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT