ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या अटकेनंतर राज्यातील पोलीस अँक्शन मोडवर आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह छत्रपती संभाजीनगर येथे छापेमारी करत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यातील ड्रग्ज प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या प्रकरणात अनेक आमदार तसेच खासदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा हात असेल, तर त्याला तातडीने जेलमध्ये टाका अशी मागणी सुद्धा शिरसाट यांनी केली आहे.
शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी आज साम टीव्हीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. सरकारने ड्रग्स प्रकरण गांभीर्याने घ्यावे. यामध्ये राज्यातील आमदार-खासदार सहभागी आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला. (Latest Marathi News)
देशभरात ड्रग्ज यांचे रॅकेट आहेत. गृहखात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार-खासदार असो वा विरोधी पक्षाचे पोलिसांनी तपास करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना जेलमध्ये टाकावं, अशी मागणी देखील संजय शिरसाट यांनी केली आहे.
दरम्यान, आझाद मैदानावरील दसरा मेळावा जोशात पार पडणार, असा विश्वास संजय शिरसाट यांनी केला. जे तुळशीपत्र घरावर ठेवून शिवसेनेसाठी लढले अशा शिवसैनिकांचा हा मेळावा आहे. स्वाभिमानी शिवसैनिक आणि बाळासाहेब यांना मानणारे शिवसैनिक या मेळाव्याला असतील, असं शिरसाट म्हणाले.
काहींनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. काश्मीरला जाऊन मिठ्या मारल्या. सिल्व्हर ओकच्या सोफ्यावर बसले,अश्या लोकांच्या मेळाव्याला शिवसैनिक नसतील, असा टोला सुद्धा संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.