Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता; आमदार-खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार?

Maharashtra Political News: जर आपण अपात्र झालो, तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची, असा प्लान शिंदे गटाच्या आमदार-खासदारांनी केल्याची माहिती आहे.
Maharashtra Politics Eknath Shinde Shiv Sena mla-mp likely to contest election on BJP ticket
Maharashtra Politics Eknath Shinde Shiv Sena mla-mp likely to contest election on BJP ticketsaam tv
Published On

Eknath Shinde Group Mla News

आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने सुनावणी वेळापत्रक सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे.

यावरुन शिंदे गटातील आमदार-खासदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. जर आपण अपात्र झालो, तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची, असा प्लान शिंदे गटाच्या आमदार-खासदारांनी केल्याची माहिती आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ओढलेले ताशेरे आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेली याचिका यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics Eknath Shinde Shiv Sena mla-mp likely to contest election on BJP ticket
Maratha Reservation: मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देता येणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

जर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले, तर इतर 24 आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार असेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेलं धनुष्यबाण चिन्ह देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळण्याची शक्यता आहे.

अशातच आगामी निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवायची असा प्रश्न शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदार-खासदारांना पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत सेनेचे ४० आमदार नव्हते.

मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरच शिवसेनेचे काही आमदार-खासदार शिंदे यांच्यासोबत आले होते, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले, तर शिंदे गटाची पंचाईत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भासह अन्य काही मतदारसंघातील खासदार, आमदार हे भाजपच्या कमळावर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याबाबतची कल्पना दिली आहे, असं साम टीव्हीला सूत्रांनी सांगितलं आहे. दुसरीकडे भाजपला मात्र शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडेच राहावं, असं वाटत आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे.

न्यायालयाने शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांच्याकडे ठेवले तर त्याचा जास्त फायदा निवडणुकीत होईल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह राहिले तर निवडणुकीत महायुतीला फायदा होईल, असेही त्यांचे मत आहे.

Maharashtra Politics Eknath Shinde Shiv Sena mla-mp likely to contest election on BJP ticket
Buldhana News: महाराष्ट्रातील अग्निवीराला सियाचिनमध्ये वीरमरण; कर्तव्यावर असताना आला हृदयविकाराचा झटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com