buldhana agniveer akshay gawate Death Due To heart attack in siachen
buldhana agniveer akshay gawate Death Due To heart attack in siachenSaam TV

Buldhana News: महाराष्ट्रातील अग्निवीराला सियाचिनमध्ये वीरमरण; कर्तव्यावर असताना आला हृदयविकाराचा झटका

Buldhana Jawan Akshay Gavate Death: बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीराला सिचायिनमध्ये वीरमरण आलं आहे. अक्षय लक्ष्मण गवते असं या वीर जवानाचं नाव आहे.
Published on

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Jawan Akshay Gavate Death

बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीराला सिचायिनमध्ये वीरमरण आलं आहे. अक्षय लक्ष्मण गवते असं या वीर जवानाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना अक्षय यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. (Latest Marathi News)

buldhana agniveer akshay gawate Death Due To heart attack in siachen
Maratha Reservation: मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देता येणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

अक्षय गवते हे बुलढाणा तालुक्यातील (Buldhana News) पिंपळगाव सराई गावातील रहिवासी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अक्षय यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ जन्मगावी पिंपळगावसराई येथे अंत्यसंस्कार करण्यात आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय "अग्निवीर"म्हणून भारतीय सैन्यदलात (Indian Army) भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन ग्लेशियरमध्ये ते कर्तव्यावर होते. जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार, अक्षय यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, त्यांना हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी अक्षय यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आले. आज म्हणजेच सोमवारी त्यांच्या पार्थिवावर पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना एक लहान बहिण असून त्यांचे आई-वडील शेती करतात. प्रचंड मेहनत आणि जिद्दीने अक्षय अग्निवीर म्हणून सैन्यदलात भरती झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे.

buldhana agniveer akshay gawate Death Due To heart attack in siachen
Satara Accident News: भयंकर! पोलिसांच्या गाडीने ४ जणांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com