Tulja Bhavani Temple Saam Tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीची गायब तलवार सापडली; महिनाभरापासून गायब होती तलवार, वाचा स्पेशल रिपोर्ट

Tulja Bhavani Temple News : तुळजाभवानीच्या मंदिरातील गायब झालेल्या तलवारीचा शोध अखेर लागलाय. मंदिरात तलवार नसल्याचे खुद्द मंदिर संस्थानने मान्य केलंय. ही तलवार नक्की कुठे आहे? आणि पुजारी मंडळानं काय आरोप केलेत ? पाहूया याबाबतचाएक खास रिपोर्ट...

Girish Nikam

महाराष्ट्राची कुलदैवता असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील एका तलवारीमुळे पुजारी आणि मंदीर संस्थान पुन्हा आमने-सामने आलेत. मंदिरातून देवीचीच तलवार गायब झाल्यानं वादाची धार वाढतच गेली. मंदिराच्या जीर्णोद्धराचं काम सुरु असताना काशी येथील गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या उपस्थितीत पुजा झाली होती. त्यावेळी देवीच्या अष्ट आयुधांतील तलवार संस्थानानं गायब केल्याचा आरोप पुजारी मंडळाने केलाय. त्यावरुन पुजारी मंडळानं आंदोलनही केलं.

दुसरीकडे अभ्यासकांनीही ही तलवार महत्वाची असून संस्थानने माहिती दडवल्याचा आरोप केलाय. तर ही तलवार भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली पाहिजे अशी मागणी भाविकांनी केलीय.

तलवारीवरुन वाद पेटल्यानंतर मंदिर संस्थानने प्रसिद्धीपत्रक काढून तलवार महंत वाकोजीबुवा यांच्या मठात असल्याचे जाहीर केलंय. दैनंदिन पूजेसाठी तलवार मठात ठेवल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तुळजाभवानी मंदिराच्या 1865 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.

जीर्णोद्धाराची कामंही सुरू आहेत. मात्र तुळजापूर मंदिरातील वाद काही संपत नाही. यापूर्वीही 2023 मध्ये तुळजाभवानीच्या पुरातन दागदागिने चोरी प्रकरणी महंतांसह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे कधी दागिने चोरी, कधी ढिसाळ व्यवस्थापन ,कधी बनावट दर्शन पास तर कधी पुजा-यांची मुजोरी यांच्यामुळे मंदिरातला कारभार कायम विवादात राहिला आहे. तलावारीच्या वादामुळे यात नवीन भर पडली आहे इतकंच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Currency Racket : कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई! बनावट नोटा रॅकेटचा भंडाफोड,तिघांना बेड्या

NPCIL Recruitment: NPCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५६,१०० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंविरोधात कारवाई होणार?, कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी तिसऱ्यांदा नोटीस

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस

US Work Permit Rules : अमेरिकेच्या निर्णयाचा होणार परिणाम, भारतीयांच्या नोकरीवर टांगती तलवार? | VIDEO

SCROLL FOR NEXT