Gas Cylinder Blast Saam tv
महाराष्ट्र

Gas Cylinder Blast : सिलेंडरच्या स्फोटांने मिरारोड हादरले; एकामागून एक पाच गॅस सिलेंडर ब्लास्ट, कामगारांच्या झोपड्या जाळून खाक

Mira Bhaynder :मिरारोड पूर्व रामदेव पार्क येथे के. डी. एम्पायर बिल्डिंग शेजारी पार्क येथे सालासर ग्रुपच्या इमारतीचे नवीन बांधकाम चालू आहे. याठिकाणी कामगारांना राहण्यासाठी काही मोकळी जागा देण्यात आली होती.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

मीरा भाईंदर : मिरारोड पूर्वेच्या रामदेव पार्क रोड परिसरात बिल्डरांच्या मोकळ्या जागेत कामगारांचे कँटीन (Mira Bhayander) असलेल्या ठिकाणी पाच गॅस सिलेंडरचा फुटल्याने मिरारोड परिसर हादरले. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात कामगारांच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. (Tajya Batmya)

मिरारोड (Mira Road) पूर्व रामदेव पार्क येथे के. डी. एम्पायर बिल्डिंग शेजारी पार्क येथे सालासर ग्रुपच्या इमारतीचे नवीन बांधकाम चालू आहे. याठिकाणी कामगारांना राहण्यासाठी काही मोकळी जागा देण्यात आली होती. त्यात कामगारांचे त्या झोपडीमध्ये (Gas cylinder) सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार एका मागोमाग एक अशा पाच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीच्या भडक्यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. यामुळे कामगारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्नीशामक दलाचे (fire Brigade) पाच बंब कार्यरत होते. तसेच सदर जागेच्या आजूबाजूला लहान मुलांच्या शाळा आणि आजूबाजूला परिसरात रहिवासी राहत आहेत. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कामगारांचे काही सामान वाचवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आले आहे. अशी माहिती अग्निशामक अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. तसेच सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व मिरारोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे हे घटनास्थळावर हजर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धरणगावच्या आश्रमशाळेतील 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

Mumbai Gateway Ferry Closed : गेटवे ते मांडवा बोटसेवा बंद! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Kantara Chapter 1 OTT : 'कांतारा' चे वादळ 'ओटीटी'वर कधी येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT