Girish Mahajan News : खडसे मोठे नेते, त्यांचा पक्ष प्रवेश असा तसा होणार नाही; गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला

Nanded News : एकनाथ खडसे हे भाजपत प्रवेश करणार असून याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना खडसे यांना भाजपात घ्यावं का तुमची काय इच्छा अस विचारलं असता, वरच्याची इच्छा वरिष्ठांच्या निर्णयावर आमची काय भुमिका राहणार
Girish Mahajan Eknath Khadse
Girish Mahajan Eknath KhadseSaam tv

संजय सूर्यवंशी

नांदेड : येत्या पंधरा दिवसात माझा भाजपात प्रवेश होणार असल्याचे एकनाथ खडसे (eknath Khadse) म्हणाले. मात्र ते कधी पक्ष प्रवेश करणार मला माहीत नाही. ते मोठे नेते आहेत. ते सांगतात माझे मोदी आणि अमित शहा यांच्याशी संबंध आहेत. त्यांचा प्रवेश असा तसा मुंबईत होणार नाही; असा टोमणा मंत्री (Girish Mahajan) गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. (Latest Marathi News)

Girish Mahajan Eknath Khadse
Girish Mahajan News : उलट पवारांनीच शिवसेना संपविली; जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप

एकनाथ खडसे हे (BJP) भाजपत प्रवेश करणार असून याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना खडसे यांना भाजपात घ्यावं का तुमची काय इच्छा अस विचारलं असता, वरच्याची इच्छा वरिष्ठांच्या निर्णयावर आमची काय भुमिका राहणार; असल्याचे महाजन म्हणाले. तर (Hingoli) हिंगोली मतदार संघात हेमंत पाटील यांना भाजपचा विरोध होता. (Nanded) भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलला का असं विचारलं असता; हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळे बदलली नाही, कार्यकर्त्यांच मत, जणमत जाणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असावा. मधल्या काळात हेमंत पाटील यांचा संपर्क तुटला होता असं म्हणणं होतं; अससेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girish Mahajan Eknath Khadse
Ulhasnagar Crime : मुलाला का मारतात म्हणून विचारायला गेलेल्या आई- वडिलांना जबर मारहाण

 
मराठा आरक्षणाचा फटका भाजपाला बसणार नाही
मराठा आरक्षण विषयाचा फटका भाजपाला बसणार नाही; तो विषय सध्या संपलेला आहे अस मंत्री गिरीश महाजन म्हणाले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कोणालाही पाठींबा दिला नाही. अनेकांनी प्रयत्न केले त्यांनी राजकारणात याव. पण जरांगे पाटील राजकारणापासुन अलिप्त राहिले. कोण कोणाला मतदान करेल यासाठी आता सगळेजण मोकळे असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com