miraj youth in qatar world cup 2022 saam tv
महाराष्ट्र

FIFA World Cup 2022 : काय सांगता ! ऑस्ट्रेलिया - डेन्मार्क सामन्यात मिरजेच्या पुढा-यांची चर्चा

इम्तियाजने मिरजेतील खराब रस्त्यांच्या समस्येची वाचा फोडली.

विजय पाटील

Fifa World Cup 2022 : मिरज मधील एका युवकाने मिरजेतील खराब रस्त्याचा मुद्दा' चक्क फुटबॉल वर्ल्ड कपच्या ग्राउंडच्या गॅलरीत बसून उपस्थित केला. सद्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. दाेहा कत्तार येथे ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क सामन्यावेळी इम्तियाज पैलवान या युवकाने मिरजेतील खराब रस्त्या बाबत पोस्टर दाखवत रस्त्यांची समस्या मांडली. त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral) होत आहे.

मिरजेतील अमननगर येथील इम्तियाज पैलवान हा कतार या ठिकाणी खाजगी नोकरी करत आहे. तो ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क यांच्यातील फुटबॉल सामना बघण्यासाठी गेला हाेता. हा सामना पाहताना त्याने मिरजेतील खराब रस्त्याच्या मुददा फूटबॉल ग्राउंडच्या गॅलरीत बसून उपस्थित केला.

I LOVE MIRAJ मला अभिमान आहे. मिरज शहराचा " काही राजकीय पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मिरजेतील रस्ते होत नाही आहेत. मिरजेतील रस्ते कधी होणार ? अश्या आशयाचा मजकूर असलेले पोस्टर दाखवत इम्तियाजने मिरजेतील खराब रस्त्यांच्या समस्येची वाचा फोडली..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT