String Instrument  Saam Tv
महाराष्ट्र

String Instrument : मिरजेतील तंतुवाद्यांना 'जीआय' मानांकन मिळणार; तालुक्याचा लौकिक जगभर वाढणार

‘तंतुवाद्याचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्यांना आता जीआय मानांकन मिळणार आहे.

विजय पाटील

Sangli News :‘तंतुवाद्याचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्यांना आता जीआय मानांकन मिळणार आहे. 'जीआय' मानांकन मिळणारा तंतुवाद्य हा देशातील पहिलाच वाद्यप्रकार आहे. यामुळे येथे तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मिळणार आहे. (Latest Marathi News)

मिरजमधील (Miraj) या वाद्यांची नक्कल आता कोणालाही करता येणार नाही. कॉपीराईटचा हक्क त्यांना प्राप्त होईल. वाद्यांच्या परदेशी निर्यातीला मोठा वाव मिळेल. जीएस म्युझिकल्सचे तंतुवाद्यनिर्माते अलताफ मुल्ला, झाकीर मुल्ला यांनी यासाठी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला होता.

मिरज शहर हे तंतुवाद्यनिर्मितीसाठी 170 वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध आहे. शहरातील आद्य तंतुवाद्यनिर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांच्या अथक प्रयत्नातून पहिले तंतुवाद्य या शहरात बनले. त्यानंतर गेल्या शतकभरात तंतुवाद्याची मोठी बाजारपेठच येथे वसली आहे. देशात आणि देशाबाहेरही मोठ्या प्रमाणात ही तंतुवाद्ये विक्री होतात.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत गायक-वादक येथून तंतुवाद्ये खरेदी करतात. अशा या तंतुवाद्यांना जीआय मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. जीआय मानांकन म्हणजे एखाद्या भौगोलिक परिसरात ज्या विशेष वस्तू, पिके, फळे, उत्पादने तयार होतात, त्यांच्या वाढीसाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी दिला जाणारा व्यापारी निर्देशांक आहे.यामुळे संबंधीत उत्पादित वस्तूंची अन्य कोणीही नक्कल करून ती वस्तू बनवू शकत नाहीत.

मिरजेतील तंतुवाद्यनिर्मिती ही अशीच वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामुळे त्याला जीआय मानांकन मिळावे, असे प्रयत्न येथील तंतुवाद्य निर्माते करीत होते. मिरजेतील जीएस म्युझिकल्सचे अलताफ मुल्ला, झाकीर मुल्ला आणि परवीन मुल्ला यांनी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून येथील वाद्यांचे महत्त्व पटवून दिले.

त्यामुळे तंतुवाद्यांना जीआय मानांकन मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. जीआय मानांकनामुळे तंतुवाद्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे. येथील विशेष वाद्यांची नक्कल कोणीही करू शकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT