Crime News
Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : खंडेराजुरी शेत जमिनीच्या कारणातून कुटुंबास काठीने बेदम मारहाण

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज (miraj) तालुक्यातील खंडेराजुरी येथे शेत जमिनीच्या कारणातून कुटुंबास काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजाराम रामचंद्र शाळगावकर यांनी अर्जुन शिवाजी रुपनर, करण अनिल रुपनर (राहणार खंडेराजुरी) यांच्याविरुद्ध पाेलीस (police) ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे. (sangli latest marathi news)

याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनूसार पाेलीसांनी दिलेली माहिती अशी : राजाराम शाळगावकर हे शेतातील काम आटोपून पत्नी व मुलासमवेत घरी परतत होते. त्यावेळी अर्जुन आणि करण राजाराम यांना " तुला बघतोच " असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी काठी ओढून घेत असताना राजाराम यांच्या हाताला जखम झाली. त्यानंतर दोघांनी राजाराम यांचा मुलगा आणि पत्नीला देखील काठीने मारहाण केल्याचे राजाराम शाळगावकर यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

SCROLL FOR NEXT