Sangli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

खाेट्या नाेटा खपविण्याचा प्रयत्न फसला; कागल, इचलकरंजी, मिरजेतील युवकांना अटक

"भारतीय बच्चे बँक"च्या हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणे दिसणा-या नोटा पाेलीसांना आढळल्या.

विजय पाटील

सांगली : मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा (fake currency) घेऊन फसवणूक करणाऱ्यासाठी आलेल्या एका टोळीला मिरज (miraj) पोलिसांनी पकडले. या प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तिघांना अटक (arrest) केली असून त्यांच्याकडून साठ हजार रुपये राेख रक्कम आणि मनोरंजन नोटासह एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (sangli latest crime news)

मिरजेतील कृष्णाघाट येथे महात्मा गांधी चौक पोलिसांच्या नाकेबंदी दरम्यान एका गाडी तपासण्यात आली. ज्यामध्ये नोटांनी भरलेली बॅग आढळुन आली. या बॅगेत दाेन हजार ,पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचे असलेले बंडल तपासले असता वर आणि खाली खऱ्या नोटा आणि आतील बाजूस लहान मुलांच्या खेळण्यासाठी असणाऱ्या "भारतीय बच्चे बँक"च्या हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणे दिसणा-या नोटा पाेलीसांना आढळल्या.

यामध्ये पाचशे रुपयांचे 55 बंडल आणि दाेन हजार व शंभर रुपयांच्या 45 मनोरंजन नोटांच्या बंडलांचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी उस्मान खुदबुद्दीन एकसंबेकर (सोमवार पेठ कागल) , नदीम नालबंद (नदिवेस नाका, इचलकरंजी) आणि शब्बीर साहेब हुसेन पीरजादे (मिरज) या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची पाेलीसांनी सखोल चौकशी केली.

या चाैकशीत त्यांनी खोट्या नोटा देऊन खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करण्यासाठी मिरजेत आल्याचे सांगितले. या तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती रविराज फडणीस (सहाय्यक पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौकी, मिरज) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT