Miraj Kolhapur passenger train latest Marathi news, Miraj Kolhapur passenger train Time table, Miraj Kolhapur passenger train News  saam tv
महाराष्ट्र

Good News: मिरज- कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू; जाणून घ्या वेळापत्रक

आता मिरज - पंढरपूर मार्गावरही पॅसेजर सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

विजय पाटील

सांगली : काेविड १९ चा (covid19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेली दोन वर्ष मिरज - कोल्हापूर पॅसेंजर रेल्वेची (miraj kolhapur passenger train) सेवा बंद ठेवण्यात आली हाेती. दरम्यान आता काेविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वेने ही सेवा सुरु केली आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनूसार मिरज - कोल्हापूर व कोल्हापूर - मिरज या पॅसेंजरच्या नियमित फेऱ्या सुरू केल्या असून प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. (Miraj Kolhapur passenger train latest Marathi news)

गेल्या दोन वर्षांपासून मिरज स्थानकातून सुटणाऱ्या मिरज - कोल्हापूरसह सर्वच पॅसेंजर रेल्वे (train) गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मिरजेतून (miraj) दररोज नोकरी व्यवसायानिमित्त दैनंदिन कोल्हापूरला (kolhapur) जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पॅसेंजर बंद राहिल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे कोल्हापूर - मिरज मार्गावर पॅसेंजर सुरु करण्याची मागणी होती.

कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाला आणि शासनाने निर्बंध शिथिल केले. त्यानंतर मध्य रेल्वे (central railway) प्रशासनाने कोल्हापूर - मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. मिरज - कोल्हापूर पॅसेंजर दररोज दुपारी २.१४ वाजता सुटून दुपारी ३.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

कोल्हापूर - मिरज पॅसेंजर दररोज सकाळी १०.३० वाजता कोल्हारातून सुटून दुपारी ११.४५ वाजता मिरज स्थानकात पोहोचणार आहे. आता मिरज - पंढरपूर मार्गावरही पॅसेजर सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यो यो हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्ट वर पावसाच सावट

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT