Mira Bhayandar Saam tv
महाराष्ट्र

Mira Bhayandar News : रस्ता ओलांडताना बसची धडक; महिलेचा मृत्यू

Mira Bhayandar : भाईंदर पूर्वेच्या बस थांब्यावर मीरा भाईंदर परिवहनच्या बस प्रवाशी घेण्यासाठी थांबली होती. प्रवाशी बसल्यानंतर बस जागेवरून निघताच समोर उभ्या असलेल्या महिलेला जोरदार धडक दिली

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे 

मीरा भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या बस स्पॉटवर एका महिलेचा बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी बस स्पॉटजवळ उभ्या असलेल्या संतप्त नागरिकांकडून बसच्या समोरील काचेची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी संबंधित बस चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास नवघर पोलीस करत आहे.

भाईंदर (Bhayandar) पूर्वेच्या नवघर रोडजवळ शनि मंदिर समोर बस स्टँड असून या ठिकाणी सर्व बस स्थानक आहेत. गुरुवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास दुर्गादेवी बिस्ट (वय ५८) ही महिला रोड क्रॉस करत असताना बसने धडक (Accident) दिली. यामध्ये महिलेचे पती देखील सोबत होते.  त्यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. बस स्टँडवर उभ्या असलेल्या नागरिकांनी जखमी महिलेला रिक्षात टाकून रुग्णालयात उपचारासाठी नेण्याच्या अगोदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड 
संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत बस चालकाला पोलिस ठाण्यात आणले असता महिलेच्या नातलगांनी एकच गोंधळ घातला. ही बस मिरा भाईंदर महानगरपालिकेची असून या अगोदर देखील मिरा भाईंदर परिवहन बसने धडक दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिवहनमध्ये भरती झालेले बस चालक यांची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. सदर चालका विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT