बायकोच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून मेहुणा फरार! Saam Tv
महाराष्ट्र

बायकोच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून मेहुणा फरार!

बुलढाणा जिल्ह्यात सर्वच बाबतीत चर्चेत असणारा चिखली तालुका दिवसेंदिवस सामाजीक दृष्ट्या खालावत चालला आहे.

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा: बुलढाणा Buldhana जिल्ह्यात सर्वच बाबतीत चर्चेत असणारा चिखली Chikhali तालुका दिवसेंदिवस सामाजीक दृष्ट्या खालावत चालला आहे. ता. २० ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेने जनस्वास्थ ढवळुन निघाले आहे. आपल्या अल्पवयीन मेहुणी सोबत सख्या मेहुन्याने अतिप्रसंग Rape केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेच्या २४ तासाच्या आत अत्याचार ग्रस्त मुलीकडुन केलेली तक्रार चिखली पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी नाकारली ही सुध्दा तेवढीच नाचक्कीची बाब.

हे देखील पहा-

कपडे घेऊन देतो म्हणून गेला होता घेऊन;

चिखली शहरातील माळीपुरा Malipura परिसरातील एका मुलीचे ४ वर्षापुर्वी जालना Jalna येथील युवकाशी लग्न झाले होते. सदर युवक हा वाहन Driver चालविण्याचे काम करीत असे. त्यामुळे त्याचा स्वभाव उडाणटप्पू स्वरूपाचा होता. सदर युवक हा ता. २० ऑगस्टच्या दुपारी चिखली शहरात आला आणि मेहुणीच्या वाढदिवसाचे निमित्ताने तिला कपडे घेऊन देतो असे म्हणत डीपी रोड वरील एका कापड दुकान Cloth Center मध्ये घेऊन गेला.

तेथे गेल्यावर कपड्यांची खरेदी केल्यानंतर त्याने तापल्या मेहुणीला घरी न घेऊन जात शिवाजी उद्यान परिसराच्या पाठीमागील बाजुस घेऊन गेला. तिथे आधीपासूनच एक पांढऱ्या रंगाची चार चाकी वाहन उभे होते. त्या युवतीस दुचाकीवरुन खाली उतरवले आणि तिचे तोंड दाबुन तिला चारचकी त्या गाडीत जबरदस्ती बसवले. दुचाकी तिथेच सोडुन चारचाकी गाडी मेहकर फाट्याकडे Mehekar Phata नेण्यास सांगितले.

त्या गाडीमध्येच युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने सुरु केला. त्यावेळेस युवतीने गाडीच्या चालकाला मदतीसाठी विनवणी केली. परंतु त्याच्याकडुन कोणतीच मदत तिला मिळाली नाही. त्यामुळे अतिप्रसंग करण्याची हिम्मत वाढली. त्याने गाडीतच अल्पवयीन असलेल्या आपल्या सालीवर जबरदस्ती अतिप्रसंग केला.

दुसऱ्यांदा कारमध्ये अतिप्रसंग;

इतक्यानेच त्या नराधमाची वासना शमली नाही, तर त्याने सदर युवतीस जालना Jalna शहरात नेऊन लॉजमध्ये Lodge खोली भाड्याने घेण्याचा खटाटोप केला. मात्र सदर बालिकाचे आधार कार्ड Adhar Card सोबत नसल्याने लॉजमध्ये त्याला खोली मिळाली नाही. म्हणुन त्याने पुन्हा गाडीतच दुसऱ्यांदा तिच्यासोबत अतिप्रसंग Rape केला. तसेच या दरम्यान पिडीतेच्या मोठ्या बहिणीचे सतत दुरध्वनीवरुन संपर्क सुरु होते. त्यामुळे नराधमाने रात्री सुमारे 2 ते 3 वाजे दरम्यान जालना शहरातील आपल्या बंद घरा समोर तीला सोडुन दिले व स्वतः पोबारा Escape केला.

सदर घटनेची माहिती आपल्या वडिलांना दिल्याने आणि दिवसभर आपली मुलगी त्यांच्या जावयासोबत बाहेर असल्याने चिंतेत असणाऱ्या वडिलांना हे ऐकून धक्का बसला. त्यांचा संताप आणि उद्वेगाने त्यांनी रात्री सुमारे 3 वाजेच्या दरम्यान जालना येथे गेले आणि आक्रोश केला. सकाळी आपल्या मोठ्या मुलीसह पिडीत बालिकेस घेऊन ते चिखली येथे आले.

अत्याचारास वाचा फुटावी म्हणुन पोलीस स्टेशन गाठले;

अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने ती अल्पवयीन खचून गेली होती. मात्र अत्याचारास वाचा फुटावी म्हणुन सदर मुलीसह त्यांनी पोलीस स्टेशन Police Station गाठले. 23 ऑगस्ट रोजी रितसर तक्रार Crime दाखल केली. त्यानुसार आरोपीवर बालकांचे लैंगिक अपराधा पासुन संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास ठाणेदार हे करीत आहे. सदर वृत्त लीही पर्यंत सदर प्रकरणातील आरोपी हा मोकाट फिरत असुन कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT