Vardha crime news update saam tv
महाराष्ट्र

अल्पवयीन तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला, पळून जाऊन लग्न करायची दिली होती धमकी

वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव टालाटुले येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : जिल्ह्याच्या तळेगाव टालाटुले येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. शुक्रवारी एका अल्पवयीन तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला होता. या गंभीर घटनेमुळं संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी मृत पावलेल्या तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी (Police) या घटनेचा कसून तपास करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मृतदेह वर्ध्याच्या शासकीय रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविला होता. (Minor girl dead body found in well)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेली तरुणी वायगाव येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. या तरुणीसोबत गोपाळ नावाचा युवक बोलण्याचा आग्रह धरायचा. परंतु, तरुणीने नकार दिल्यावर मोबाईलवरून फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. त्यानंतर तरुणीने या प्रकाराबाबत आईला सांगितल्यावर त्या युवकाला समजावण्याचा प्रयत्नही केला.

मात्र, ३१ ऑगस्ट रोजी गोपालने तरुणीच्या काकाला पुतणीसोबत लग्न लावून देण्याबाबत सांगितलं. लग्न जुळवून नाही दिले पुतणीला पळवून नेईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर ३१ ऑगस्टला सायंकाळी तरुणी घराबोहेर गेली पण घरी परतलीच नाही. त्यानंतर या तरुणीचा मृतदेह २ सप्टेंबरला विहिरीत आढळला. या धक्कादायक घटनेबाबत तरुणीच्या आईला कळताच गोपाल विरोधात हत्येची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गोपाल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.

या घटनेमुळं जिल्हा सामान्य रुग्णालयात बराच वेळ वातावरण तणावपूर्ण होतं.जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी उसळली होती.आरोपीवर गुन्हा दाखल करत नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली होती.खासदार रामदास तडस यांनीही रुग्णालयात भेट देत पीडित तरुणीच्या कुटुंबीयांशी या प्रकरणी चर्चा केली. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलयं.सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय.पोलिसांच्या तपासात काय बाबी पुढं येतात,याकडं सर्वांचं लक्ष लागलंय, अशी माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT