Yogesh Kadam on Hindi Language Comuplsion Saam Tv News
महाराष्ट्र

Yogesh Kadam : महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नसेल तर...; गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

Yogesh Kadam on Hindi Language Comuplsion : राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की 'महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुमचे वर्तन असं नसावं की तुम्ही मराठी बोलणार नाही', असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

Prashant Patil

मुंबई : सोशल मीडियावर मीरा भाईंदर येथे एका दुकानदाराला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात एक नवीन राजकीय आणि भाषिक वाद निर्माण झाला आहे. मीरा रोड येथील एका दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिला, त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. आता या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सात जणांवर कारवाई केली आहे. दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने मीरा भाईंदर येथील व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की 'महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुमचे वर्तन असं नसावं की तुम्ही मराठी बोलणार नाही', असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

योगेश कदम पुढे म्हणाले की, 'जर कोणी मराठीचा अपमान केला तर आम्ही कायद्यानुसार कारवाई करू. कोणीही कायदा हातात घेऊ नये, मारहाण करणाऱ्यांनी तक्रार दाखल करायला हवी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मीरा रोड येथील एका मिठाई दुकानाचे मालक बाबूलाल खिमजी चौधरी (वय ४८) यांना मारहाण केली आणि हा वाद सुरु झाल्याचं बोललं जात आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी हिंदीत बोलल्यामुळे ते संतापले आणि नंतर त्यांनी दुकानदाराला मारहाण केली. ही घटना मंगळवारी घडली. त्यानंतर त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खिमची चौधरी यांनी पोलिसांना सांगितलं की, 'सकाळी १०.३०च्या सुमारास काही लोकं त्यांच्या दुकानात आले. ते सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फटके परिधान करून आले होते. त्यांनी पाणी मागितलं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यानं हिंदीत उत्तर दिलं तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे आपापसात वाद झाला'. चौधरी पुढे म्हणाले की, 'त्यांचे कर्मचारी इतर राज्यातील आहेत आणि त्यांना मराठी येत नाही. महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते असं विचारल्यावर वाद अजून वाढला'. त्यावर दुकान मालक चौधरी यांनी उत्तर दिलं की, 'येथे सर्व भाषा बोलल्या जातात. कार्यकर्त्यांना हे आवडलं नाही आणि त्यांनी चौधरी यांना मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ देखील बनवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT