Nitin Raut Saam TV
महाराष्ट्र

मोठी बातमी! कोळशाबाबत महाराष्ट्र स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मागील काही महिन्यांपासून गरेपालमा कोळसा खाणीची (coal mining) वन मंजुरी प्रलंबित (forest permission) असल्यामुळे खाण विकासकामे अडकून पडली होती. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत (Nitin Raut) यांनी या प्रकरणी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल (Bhupesh Baghel) यांची रायपूर येथे व्यक्तिगत भेट घेऊन त्यांना या समस्येबाबत सांगितलं. तसंच केंद्र शासनास (central government) शिफारस करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार वन टप्पा १ मंजुरी शिफारशीसह केंद्र शासनाकडे तातडीने आज १९ एप्रिल रोजी पाठविण्यात आले. त्यामुळे महानिर्मितीच्या खाण विकासकामांना (coal development) गती प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

याप्रसंगी छत्तीसगडचे अप्पर मुख्य सचिव (महसूल)सुब्रत साहू, ऊर्जा सचिव अंकित आनंद, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक(पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. महानिर्मितीच्या वीज उत्पादनासाठी कोल इंडियाच्या विविध कोळसा कंपन्यांसमवेत इंधन करार असून त्यासाठी कोल इंडियावर पूर्णतः अवलंबून राहावे लागते.

वीज उत्पादनाकरिता आवश्यक कोळश्याबाबत स्वयंपूर्ण होता येईल या दृष्टीने छत्तीसगड राज्यातील रायगढ जिल्ह्यातील गरेपालमा सेकटर २ येथे महानिर्मितीला केंद्रीय कोळसा मंत्रालयाने खाण आवंटीत केली आहे. सुमारे २५८४ हेकटर परिसरात ही खाण असून यामध्ये १४ गावे आहेत. या खाणीची २३.६ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्षं कोळसा क्षमता आहे.आगामी ३० वर्ष येथून महानिर्मितीला कोळसा मिळणार आहे.

Edited By -Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT