Rajasthan Accident: भीषण अपघात; भरधाव वेगानं घेतले एकाच कुटुंबातील १० जणांचे बळी

Accident
AccidentSaam tv
Published On

जयपूर: राजस्थानमधील झुंझनू जिल्ह्यातील गुढागौडजी येथे राज्य महामार्ग-३७ वर पिकअप वाहनाला (Accident in rajasthan) भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू (ten people died) झाला. मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. झुंझनू जिल्ह्यातील गुढागौडजीत हा भीषण अपघात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुमेर यादव (वय ५०), कैलाश, भंवरलाल, राजबाला, अर्पित (वय १५), मनोहर (वय ५०), नरेश (वय १६), कर्मवीर (वय २०), बलवीर (वय ४०), सावित्री (वय ४५), अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना झुंझनूहून जयपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. भरधाव वेगामुळं चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Accident
राज्यात वीज टंचाई; CM उद्धव ठाकरेंनी दिले 'हे' निर्देश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेला पिकअप वाहन गुढागौडजी येथे राज्य महामार्ग-३७ रस्त्यावर पलटी झाला. त्यानंतर दहा जणांचा या अपघाता मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एडीएम जेपी गौड आणि सीएमएचओ डॉ. सी. एल. गुर्जर हे बीडीके यांनी रुग्णालयात धाव घेतली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून या दुर्देवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले. झुंझनूच्या गुढागौडजी परिसरात अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे, ही दुःखद घटना आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. दुर्घटनेत जखमी झालेले लवकरच बरे होवोत, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधा मोदींची आर्थिक मदतीची घोषणा

राज्य महामार्ग क्रमांक ३७ वर पिकअप उलटून हा अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २ लाख रुपये आर्थिक मदत, तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

Edited By- Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com