narhari zirwal viral news Saam tv
महाराष्ट्र

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ अचानक कसा बाहेर आणला गेला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून गंभीर आरोप

narhari zirwal viral news : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वादग्रस्त व्हिडिओवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केला.

Vishal Gangurde

मंत्री झिरवळ यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

विरोधकांकडून झिरवळ यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांची पहिली प्रतिक्रिया

मंत्री नरहळी झिरवाळ यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शासकीय विश्रामगृहात मद्यपान आणि तृतीयपंथी सोबत असलेल्या व्हिडिओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत सापडले आहेत. या प्रकारामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री झिरवाळ यांची तत्काळ मंत्रि‍पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री झिरवाळ यांच्या वादग्रस्त व्हिडिओवर सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. माजी आमदार अमोल मिटकरी म्हणाले, 'भोंदूबाबाबरोबर काही लोकांचं धार्मिक कनेक्शन उघड झालं. त्यानंतर सहा-सात महिन्यांपूर्वी काढून ठेवलेला नरहरी झिरवळ यांचा व्हिडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला? राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे नरहरी झिरवळ'

'सुनेत्रा पवार अध्यक्ष व्हाव्यात, ही इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये ACB चा ट्रॅप लावणे आणि नंतर आता हा व्हिडीओ सात महिन्यापूर्वी काढून मीडियाला सोपवणे. एका सरळ माणसाला बदनाम करायचं. त्यानंतर मीडिया ट्रायल..हे झारीतील शुक्राचार्य कोण? अशोक खरात प्रकरण अंगलट येतय. त्यामुळे स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार असून हे वंगाळ राजकारण लक्षात येतंय. सोमवती अमावस्या ते अघोरी पूजा या मागे २ सप्टेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६, असे अमोल मिटकरी म्हणाले.

विरोधकांकडून मंत्री झिरवळ यांच्यावर हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री झिरवाळ यांच्यावर टीका केली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मंत्री नरहरी झिरवळ यांचं अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. खरंतर हा प्रकार केवळ व्यक्तिगत मर्यादांचा भंग नसून सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. या मंत्र्‍याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, अशी साधी अपेक्षा असते. व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होतंय. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सणासुदीच्या तोंडावर सोनं महागलं; प्रति तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये; २२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Jowar Kadhi Recipe: रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं हवंय? झटपट तयार होणारी खमंग खान्देशी ज्वारी कढी नक्की ट्राय करा

Maharashtra News Live Update : TCS प्रकरणातील आरोपीचं दिल्ली ब्लास्टमधील आरोपीसोबत कनेक्शन?

पुणे महापालिकेमध्ये टक्केवारीवरू भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांमध्ये राडा

Summer Food Tips: उष्मघातापासून बचाव होण्यासाठी उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT