Annabhau sathe  SaamTvNews
महाराष्ट्र

चळवळीतल्या महामानवाचा अपमान भाजप सरकारने केला; मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल!

साहित्यरत्न अण्णाभाऊंची माहिती केंद्राला नसेल तर आम्ही राज्य सरकार मार्फत अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा एक अहवाल केंद्राला पाठवू.

विनोद जिरे

बीड : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या महामानवांच्या यादीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे(Annabhau Sathe) यांचे नाव नसल्याची बाब समोर आल्यानंतर अनुसूचीत जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि उदगीरचे (Udgir) माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी फाऊंडेशनला पत्र लिहून, महामानवांच्या यादीत अण्णाभाऊ साठे यांचा समावेश करून सुधारणा करावी असे पत्रे लिहले. मात्र, अण्णाभाऊ हे प्रसिदध नाहीत, त्यामुळे ते महामानव ठरत नसल्याचा उल्लेख असलेले पत्र फाऊंडेशनने भालेराव यांना पाठवले आहे. यावरून आता राजकारण तापत आहे.

हे देखील पहा :

एका चळवळीतल्या महामानवाचा, कामगार नेत्याचा अपमान, केंद्र सरकारने केलेला आहे. कदाचित केंद्र सरकार मध्ये बसलेल्या एकाही व्यक्तीने, अण्णाभाऊंचे साहित्य वाचलं असतं, तर अण्णाभाऊ साठे यांनी, या उपाशीपोटी राहणाऱ्या माणसांची व्यथा, उपाशी राहून आपल्या लेखणीतून कशी लिहिली ? आपल्या शायरीतून गरीबांची आणि कामगारांची व्यथा कशी मांडली? हे भारतीय जनता पार्टीला (BJP) माहीत नसेल, तर नक्कीच महाराष्ट्रातला सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्याने, ज्या महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला, तोच महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंची खरी ओळख भारतीय जनता पार्टीला करून दाखवेल. असा सूचक इशारा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे दिला आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केंद्र सरकारला प्रतिष्ठित वाटत नसतील तर हे दुर्दैव आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊंची माहिती केंद्राला नसेल तर आम्ही राज्य सरकार मार्फत अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा एक अहवाल केंद्राला पाठवू. असं देखील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे ट्विट करून म्हणाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

SCROLL FOR NEXT