Deepak Kesarkar
Deepak Kesarkar Saam TV
महाराष्ट्र

Panvel News: कोकण शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रेंसाठी शिंदे गटाची फिल्डिंग; केसरकरांनी केला मोठा दावा

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Konkan Teachers Constituency News : विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील आणि शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यां दोघांमध्येच महत्वाची लढत असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. या मतदारसंघात उमेदवार म्हात्रे ५ हजार मतांच्या फरकाने विजयी होतील, असा दावा शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. (Latest Marathi News)

गेल्यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेकापच्या बाळाराम पाटील यांनी विजय मिळवला होता. तर दुसरीकडे रायगडमध्ये शेकापचं अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळे कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बाळाराम पाटील आणि शेकापला आपलं अस्तित्व राखण्याचं आव्हान असणार आहे.

या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने शेकापचा पराभव करण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे मैदानात उतरले आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील आणि शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीवरून मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) मोठा दावा केला आहे.

दीपक केसरकर म्हणाले, ' कोकण शिक्षक मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. सर्व शिक्षक आणि संस्था चालक उमदेवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठिशी आहेत. किमान ५ हजार मतांच्या फरकाने म्हात्रे विजयी होती याची खात्री आहे'.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. केसरकर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले, 'आदित्य ठाकरे काय बोलतात हा एक संशोधनाचा विषय असतो. आदित्य ठाकरेंचं (Aaditya Thackeray) तरुण वय आहे. त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. स्वत:च्या आजोबांच्या जन्मदिनाला स्मृतिदिन त्यांनी म्हटले. त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलायचं?आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे कारण ते बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत'.

'बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे की जन्मदिन हे त्यांना माहित नसेल तर त्यांना इतर गोष्टी बद्दल बोलायचा काय अधिकार? सकाळी त्यांच्या आरोपांना उत्तर दिली आहेत. काही दिवसात अशी वेळ येईल की लोकच म्हणतील यांच्या आरोपांना उत्तर देऊ नका, असेही दीपक केसरकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

Eknath Khadse: सुनबाईसाठी एकनाथ खडसे मैदानात; 'भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याआधीचं केली प्रचाराला सुरूवात!

Water Shortage : मराठवाड्यात तीव्र टंचाई; टँकरची संख्या वाढून पोहचली १४०० च्या वर

SCROLL FOR NEXT