MLA Gopichand Padalkar demonstrates fake milk preparation using lime and oil in Vidhan Bhavan, Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

सावधान! दूधात तेल आणि चुना? तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ? आमदारांनी डेमो दाखवला...कारवाई कधी?

Milk Adulteration Exposed: तुमच्या घरी येणाऱ्या दूधात चुना आणि तेलाची भेसळ आहे का? कारण चक्क सत्ताधारी आमदारांनीच दुधातील भेसळीचा डेमो दिलाय... ही भेसळ नेमकी कशी होते? आणि तुमच्या घरात येणारं दूध खरंच भेसळयुक्त आहे का? पाहूयात...या स्पेशल रिपोर्टमधून..

Suprim Maskar

सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच विधानभवन परिसरात थेट युरिया, हायड्रोजन पेरॉक्साईड, चुना आणि तेल यासारख्या गोष्टीचा वापर करून भेसळीचं दुध कसं बनवलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि सरकारलाच घरचा आहेर दिला..

भेसळयुक्त दूध माफीयांमुळे शेतकऱ्यांना दूधाचा योग्य दर मिळत नाही. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केलीय. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदारांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकानंतर विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

सत्ताधारी आमदारांच्या दाव्यानंतर तुमच्या घरी येणाऱ्या दूधातही भेसळ आहे का हे तपासून घ्या

कशी ओळखायची दुधातली भेसळ?

१. दूध उकळून थंड करा. त्यात 2-3 थेंब आयोडीन टाका..

दुधात स्टार्च नसेल तर रंग तसाच राहील .

जर स्टार्च असेल तर रंग निळा होईल

२. एका ग्लासात थोडं दूध घ्या. तेवढेच पाणी घ्या. आणि जोरात ढवळा.

जर पाण्यात डिटर्जंट घातले असेल तर त्याला फेस येईल.

३. थोडं दूध घेऊन त्यात सोयाबिन टाका. व्यवस्थित ढवळा. त्यात लाल लिटमस पेपर बुडवा. जर त्यात युरिया मिसळले असेल तर पेपर निळा होईल

४. थोड्याशा दुधात सल्फ्युरीक अॅसिड टाका आणि न ढवळता तपासा. जर रंग निळा झाला तर दुधात फॉर्मलिन आहे.

भेसळ आढळल्यास FDA कडे त्यासंदर्भात निश्चितच तक्रार करा. मात्र आमदारांच्याच प्रात्यक्षिकानंतर आणि मुख्यमंत्र््यांच्या आदेशानंतर तरी भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT