Midnight Shootout saam tv
महाराष्ट्र

Midnight Shootout: दरोडा प्रकरणात फेक एन्काऊंटर ? अमोल खोतकरचा एन्काऊंटर की सुपारी?

Midnight Shootout: संभाजीनगरातील दरोडा प्रकरणात खाकीचं संशयाच्या भोवऱ्यात सापडलीय.. पोलिसांनी आरोपीची सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र हा आरोप कुणी केलाय? संभाजीनगरमधील दरोड्याचं प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. पोलिसांनी एका संशयित गुन्हेगाराचा एन्काऊंटर केलाय. वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून 15 मे रोजी दरोडेखोरांनी तब्बल आठ किलो सोनं आणि 40 किलो चांदी असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला होता.

त्यानंतर याप्रकरणात 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी सापळा रचला. मात्र त्यावेळी अमोलनं पोलिसांवर गोळाबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला.

संशयित गुन्हेगार अमोल खोतकरच्या एन्काऊंटरनंतर खोतकर कुटुंबीयांनी पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांनीच अमोलची हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. या प्रकरणात पोलिसांनी दोन ते तीन कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोपही केलाय. आम्हाला न्याय द्या, अशी मागणी खोतकर कुटुंबीयांनी केलीये.

दरम्यान संभाजीनगरमधील दरोड्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याचा संशय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला होता. गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये गुन्हे वाढलेत. गेल्या 10 दिवसात संभाजीनगरमध्ये 3 दरोड्यांच्या घटना घडल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

संभाजीनगर गुन्ह्यांच्या विळख्यात

वाळुजच्या टोके शिवारात 5.5 लाखांचा दरोडा

मीसरवाडीत बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण आणि खून

उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर कोट्यवधींचा दरोडा

निलेश बागुल यांच्या घरातून दीड लाखांचा ऐवज लुटत दरोडा

एकीकडे खोतकर कुटुंबीयांकडून पोलिसांवर होणारे गंभीर आरोप आणि दुसरीकडे मंत्री संजय शिरसाटांचा संशय यामुळे संशयीत आरोपी आणि पोलिसांची ही खरच चकमक होती की फेक एन्काऊंटर असा प्रश्न उपस्थित होतोय.

संभाजीनगरात गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांचा वचक राहिला नाही. दरोडेखोराचे पोलिसांशी संबंध असल्यामुळेच हा फेक एन्काऊंटर झाला आहे का? गृहमंत्री फडणवीस या प्रकरणाची दखल घेणार का? निष्पक्ष तपास होऊन खऱ्या आरोपींना शिक्षा होणार का? याकडेचं राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND VS ENG: पाचव्या टेस्ट सामन्यातून ऋषभ पंत बाहेर; 'या' नवख्या खेळाडूला टीम इंडियात संधी, BCCI ने केलं कन्फर्म

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

SCROLL FOR NEXT