
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. सिद्धांत शिरसाट यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने आरोप मागे घेतल्याचं सांगितलं जात आहे.'हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये, मी फुलस्टॉप देते असं म्हणत विवाहित महिलेने आरोप मागे घेतलेत.
अचानक असं आरोप घेतल्यानं या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आलय. दरम्यान आरोप मागे घेण्यासाठी महिलेवर राजकीय दबाव आणण्यात आला, असावा अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे. हे आपले घरघुती प्रकरण आहे, या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, असं म्हणत महिलेने आरोप मागे घेतले आहेत. महिलेने आरोप मागे घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून शिंदे सेनेवर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे.
आपण आरोप मागे घेत आहे, आपल्यावर कोणताच दबाव नाही, संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते, सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मागे घेते. या आमचा वैयक्तिक प्रश्न असून या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला फुलस्टॉप देत आहे, असं आरोप करणाऱ्या महिलेनं म्हटलंय.
जर कोणी माझ्या नावाने राजकरण करेल तर मी कायदेशीर कारवाई करेन असा इशाराही त्या महिलेने दिलाय. मी शिरसाट साहेबांचा सन्मान करतेय. त्यांनी मला कधीच त्रास दिला नाही. त्यांनी कधीही फोन केला नाही,असंही त्या महिलेनं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.