Sakshi Sunil Jadhav
जीवनामध्ये मिळालेल्या गोष्टींचे सोने करण्याचा आजचा दिवस आहे. अर्थात ज्या मिळणार आहेत त्या सहज गोष्टी आज मिळतील. आनंदाचे क्षण जीवनात येणार आहेत.
आपली अर्थत्वाची असणारी रास आहे. पैशाचे आपल्याला विशेष महत्त्व आहेच. आज विशेष खटपट आणि धडपड पैसा मिळवण्यासाठी कराल.
व्यवसायासाठी नवीन वाटा मिळतील. कदाचित एखादा नवीन व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू करण्याचा मानस असेल तर आज ती इच्छा पूर्ण होईल.
तब्येतीच्या तक्रारी त्रास देतील. विशेषतः मानसिक स्वास्थ खराब होईल. ताणतणाव यांनी भरलेला आजचा दिवस आहे. आजोळी मात्र प्रेम वाढेल. दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे.
प्रेमामध्ये आज अहंकार बाळगू नका. आपल्या प्रियकराला प्रेयसीला समजून घेऊन पुढे गेलात तर दिवस चांगला आहे. रवी उपासना विशेष फलदायी ठरणार आहे.
एखाद्या निर्णय घेताना गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित आयुष्यात दोन पर्याय पुढे उभे राहतील. त्यातून एकाचा निर्णय घेणे आज गरजेचे आहे.
बहिणीची विशेष माया आणि प्रेम आज आपल्याला लाभेल. जवळच्या व्यक्तीकडे सहकार्य मिळाल्यामुळे काम करण्यासाठी वेगळा हुरूप येईल.
विनाकारण एखाद्या गोष्टींमध्ये अडथळा संभावतो आहे. घरातील व्यक्तींना बरोबर घेऊन गेल्यास दिवस सुखकर राहील. पैशाची आवक जावक चांगली राहिल.
"अर्धा घोडा आणि अर्धा माणूस" असे आपल्या राशीचे चिन्ह आहे. काही गोष्टींचे निर्णय पटकन घेतले जातात पण चुकीचे होतील. अशा गोष्टी आज होतील.
मी पण सोडून आज वागावे लागेल.योग्य ठिकाणी पैसा खर्च करा. नाहक खर्च करूच नका. अर्थात आपली चिकट आणि कंजूस असणारी रास विनाकारण पैसा खर्च झाला तर मनस्वास्थ्य ढासळेल.
स्वतःबरोबर इतरांना सुद्धा महत्त्व देण्याचा आजचा दिवस आहे. नव्याने परिचय होतील. विविध लाभ मिळतील.
राजकीय, सामाजिक क्षेत्र आज आपल्यासाठी नव्याने संधी घेऊन आलेले आहे.कामाच्या ठिकाणी सुद्धा आपलं कार्यक्षेत्र वाढणार आहे.