Agriculture Land Partition Deed: फक्त ५०० रुपयांमध्ये शेतीची वाटणी होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतजमिनीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय.
Agriculture Land Partition Deed
Maharashtra Cabinet Meetingsaam tv
Published On

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत १० महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेत जमिनीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेतजमिनी वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार कमी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 85 नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाममात्र आहे. मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही. मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करीत नाहीत. नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Agriculture Land Partition Deed
Maharashtra Government Decision: राज्य सरकारचा निर्णय; विधि आणि न्याय विभागात नोकरीची संधी, Typistच्या नवीन ५ हजार पदांची निर्मिती

त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना वाटप पत्राची नोंदणी सहजपणे करता येईल. या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी 35 ते 40 कोटी रुपयांची घट येऊ शकते. मात्र शेतीच्या वाटप पत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करत नाहीत. नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण झाल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतो. दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाचे इतर निर्णय

रायगड जिल्ह्यामधील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील मतिमंद प्रवर्गाच्या कार्यशाळेसाठी ७५ अनिवासी विद्यार्थी संख्येस अनुदान तत्त्वावर मान्यता मिळालीय. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयातील आकृतीबंधानुसार शिक्षक आणि शिक्षकेत्तर संवर्गाची एकूण १४ पदे अनुज्ञेय होत आहेत.

याकरिता येणाऱ्या ५८ लाख ३७ हजार ९०८ रूपयांच्या दरवर्षीच्या खर्चासही मंजुरी देण्यात आलीय. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे 'उप कृषि अधिकारी' व 'सहाय्यक कृषि अधिकारी' असा बदल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com