MHADA Latest News Update
MHADA Latest News Update SAAM TV
महाराष्ट्र

MHADA Update : म्हाडा येत्या वर्षात राज्यभरात १२,७२४ घरं बांधणार; 2 हजारांहून अधिक मुंबईकरांची होणार स्वप्नपूर्ती

Chandrakant Jagtap

>> संजय गडदे

MHADA News : सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देणाऱ्या म्हाडाचा सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. म्हाडा यंदा अमृत महोत्सवी 75 वे साजरे करत असताना येत्या वर्षभरात संपुर्ण राज्यभरात तब्बल १२७२४ घरे बांधणार असून यातील तब्बल 2152 घर ही मुंबईकरांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी प्राधिकरणाकाने अर्थसंकल्पात ५८००.१५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

प्राधिकरणाच्या सन २०२३-२०२४ च्या १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२२-२०२३ च्या सुधारित ६९३३.८२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात शून्य तूट तर सन २०२२-२०२३ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११३६.४७ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोंकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १२७२४ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.

मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात २१५२ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३६६४.१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोंकण मंडळाअंतर्गत ५६१४ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात त्यासाठी ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे मंडळाअंतर्गत ८६२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी  सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५४०.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  नाशिक मंडळाअंतर्गत ७४९ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ७७.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. औरंगाबाद मंडळाअंतर्गत १४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २१२.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नागपूर मंडळाअंतर्गत १४१७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४१७.५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती मंडळाअंतर्गत ४३३ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १४६.२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Latest Marathi news)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक; तीन कॅफेशॉप फोडले

High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

SCROLL FOR NEXT