MHADA Konkan Housing Lottery 2025 announced: 5,285 affordable flats and 77 residential plots up for grabs in Thane, Palghar, Badlapur, and Sindhudurg. Saam Tv
महाराष्ट्र

MHADA Lottery: ठाणे, पालघरमध्ये म्हाडाची ५२८५ घरे; बदलापूर, सिंधुदुर्गात ७७ भूखंडांसाठी लॉटरी|VIDEO

MHADA Housing Lottery 2025: म्हाडा कोकण मंडळाच्या २०२५च्या गृहनिर्माण सोडतीत ठाणे, पालघरमधील ५,२८५ सदनिका आणि बदलापूर, सिंधुदुर्गातील ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध असून, अर्ज प्रक्रिया १४ जुलैपासून सुरू होणार आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, तसेच वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत एकूण ५,२८५ सदनिका आणि ओरोस (जि. सिंधुदुर्ग) व कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. सदर सोडतीची अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार आहे.

सोडतीचे पाच घटक:

२०% सर्वसमावेशक योजना – ५६५ सदनिका

१५% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – ३,००२ सदनिका

म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका) – १,६७७ सदनिका

५०% परवडणाऱ्या घरांची योजना – ४१ सदनिका

७७ भूखंड – ओरोस व कुळगाव-बदलापूर येथे

अर्जाची अंतिम तारीख:

ऑनलाइन अर्ज: १३ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत

अनामत रक्कम भरणा: १४ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत

सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या अर्जदारांची पात्रता तपासली जाणार असून, प्रारूप यादी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

२५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर दावा-हरकती नोंदवता येतील. १ सप्टेंबर २०२५ रोजी अंतिम पात्र अर्जांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल.

संगणकीय सोडत:

३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे संगणकीय सोडत जाहीर केली जाईल.

अर्जदारांना निकाल SMS, ई-मेल आणि ऍपद्वारे मिळेल.

सोडतीसाठी IHLMS 2.0 संगणकीय प्रणाली आणि मोबाईल ऍपचा वापर केला जाणार असून, अ‍ॅन्ड्रॉइड आणि iOS दोन्ही साठी उपलब्ध आहे.

अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध मार्गदर्शक पुस्तिका, ध्वनीचित्रफीत, हेल्प फाईल्स आणि सहाय्यक माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्राचे आरोग्याशी संबंधित दोष कोणते आहेत?

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

SCROLL FOR NEXT