Heat Wave Alert saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रात होरपळ! एप्रिल ते जूनमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज

Summer Weather News: एप्रिल आणि जून दरम्यान तापमान किती वाढणार याची चिंता आता नागरिकांना सतावत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Summer Weather News : यंदाचा उन्हाळा डोक्याला ताप देणारा ठरु शकतो. हवामान विभागाच्या अंदाजाने नागरिकांची चिंता आणखी वाढवली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये एप्रिल आणि जून दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा पारा 40 अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे एप्रिल आणि जून दरम्यान तापमान किती वाढणार याची चिंता आता नागरिकांना सतावत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्याचा उष्णतेचा पारा अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या उष्णतेचा सामना करताना काळजी घेण्याची गरज आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पाऊस देखील चिंता वाढवू शकतो. (Latest News Update)

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. यामुळे एप्रिलमध्ये 6 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचाही अंदाज आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोणत्या राज्यात उष्णतेची लाट येणार

बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतातील काही भाग सोडला तर सर्वच ठिकाणी भीषण गर्मीचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Dry Skin Care Tips: कोरड्या त्वचेवर लावा फक्त 'या' 3 गोष्टी, चेहरा उजळून निघेल

Ajit Pawar Death: आज ही शेवटची पहाट दादांना भेटायला यायची, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या ढसाढसा रडल्या; पाहा VIDEO

Panchang Today: जया एकादशीचा शुभ दिवस! विष्णू जपाचा लाभ आणि आजचे शुभ-अशुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT