Kalicharan Maharaj News : कालीचरण महाराज पुन्हा बरळले; नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते योग्यच

Kalicharan Maharaj News : नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे.
Kalicharan Maharaj
Kalicharan MaharajSaam Tv
Published On

रणजीत माजगावकर

Kalicharan Maharaj News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या कालीचरण महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते बिल्कूल योग्य केले, असं गंभीर स्वरुपाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे. जितके नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल, असा दावाही कालीचरण महाराजांनी केला आहे.

Kalicharan Maharaj
Political News : गेलेले आमदार परतणार अन् नारायण राणेंचं मंत्रिपदही जाणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

याआधीही कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. गांधीजींना शिवीगाळ करताना त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं गुणगानही गायलं होत. कालीचरण महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. कालीचरण महाराजांच्या अटकेची मागणीही मोठ्या प्रमाणात केली जात होती. (Latest Marathi News)

Kalicharan Maharaj
Sanjay Raut Death Threat: गेंड्याच्या कातडीचं सरकार, विरोधकांना मारण्यापर्यंत यांची मजल; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

राहुल गांधींवरील कारवाई योग्यच

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. राहुल गांधींना त्यांच्या कर्माची फळे मिळाली आहेत. हिंदू लोक हे राहुल गांधींच्या व्होटर बँकचे शत्रू आहेत.

मात्र हिंदू आता शेळपट नाही राहिला. फालतू सेक्युलरिझम हिंदूंनी सोडून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी हिंदू एक होत आहे, असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com