राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मेस्मा कारवाई ? अनिल परब म्हणाले... Saam Tv
महाराष्ट्र

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मेस्मा कारवाई ? अनिल परब म्हणाले...

एसटी संपासंदर्भात आज एसटी कार्यालयात परिवहन मंत्र्यांची महत्वाची पार पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एसटी संपासंदर्भात आज एसटी कार्यालयात परिवहन मंत्र्यांची महत्वाची पार पडली. मेस्माअंतर्गत (MESMA) कारवाई करण्याबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली. तर, या प्रकणावरील कारवाई करण्याबद्दल कसलाही निर्णय झाला नाही, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. परब म्हणाले, कोर्टाचा निर्णय २० तारखेला होणार आहे. तोपर्यंत कसलीही कारवाई करणार नाही. त्याचबरोबर मेस्मा संदर्भात कसलीही चर्चा झालेली नाही अशी माहितीही परब यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

पुढे अनिल परब म्हणाले की, उच्च न्यायालयाने २० तारखेला याबाबत आपले प्राथमिक मत काय आहे? याबाबतीत अहवाल मागितला आहे. यासर्व कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी आज अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे. आमचा प्राथमिक अहवाल २० तारखेला दाखल करणार आहोत. आज झालेल्या बैठकीत आम्ही आढावा घेतला आहे. यामध्ये अधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र कर्मचाऱ्यांवर मेस्मा (MESMA Act) लावायचा की नाही याबाबत निर्णय २० तारखेनंतर घेतला जाईल अशी माहिती परबांनी यावेळी दिली.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा (MESMA Act) कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा गेल्या आठवड्यात मंत्री अनिल परब यांनी दिला होता. परंतु तरीही राज्यातील एसटीच्या विविध आगारांमधे कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबरपासून आंदोलन सुरु आहे. तर दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष संपला सुरुवात केली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा करण्यात आली मात्र त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT