Badalapur Car Accident SaamTv
महाराष्ट्र

Car Accident: बदलापूरात भरधाव मर्सिडिजने फेरीवाल्यांना उडवले; संतप्त जमावाने चालकाला दिला बेदम चोप

हे फेरीवाले आणि कार चालकाचे पूर्वीचे वाद असून याच वादातून फेरीवाल्यांना उडवल्याची या परिसरात चर्चा आहे.

Gangappa Pujari

अजय दुधाणे, बदलापूर

Badalapur: बदलापूर शहरात एका भरधाव मर्सिडिजने फेरीवाल्याने उडवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाबाहेर दुपारी ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात फेरीवाले जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर नागरिकांनी संतापून कार चालकाला बेदम चोप दिला आहे. (Car Accident)

याबाबत अधिक माहिती अशी की, बदलापूर पश्चिमेच्या मुख्य बाजारपेठेतील खाऊगल्लीत दिवाकर शेट्टी हा इसम वास्तव्याला आहे. आज दुपारच्या सुमारास शेट्टी हा त्याच्या मर्सिडीज कारने या गल्लीतून जात असताना त्याने ३ ते ४ फेरीवाल्यांना उडवल्याचा प्रकार घडला आहे. या अपघातात फेरीवाले जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर संतप्त जमावाने दिवाकर शेट्टी याला बेदम चोप दिला.

संपप्त जमावाने केलेल्या मारहाणीत कार चालकही जखमी झाला आहे. दरम्यान, दिवाकर शेट्टी आणि हे फेरीवाले यांचे पूर्वीचे वाद असून याच वादातून शेट्टी याने फेरीवाल्यांना उडवल्याची या परिसरात चर्चा आहे. मात्र या सगळ्याचा तपास सुरू असून तपासाअंती या घटनेचं नेमकं कारण समोर येईल, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे. (Badalapur News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT