मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला अरुण जोशी
महाराष्ट्र

मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या, लॉकडाऊनमुळे अनेक महिन्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या चिखलदऱ्यातील वैराट जंगल सफारी ही बंद करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर बंद असलेल्या, लॉकडाऊनमुळे Lockdown अनेक महिन्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या चिखलदऱ्यातील वैराट जंगल सफारी ही बंद करण्यात आली होती. जंगल सफारी बंद असल्याने, येथील जिप्सी चालक, वाहक, गाईड Guide यांना अर्थिक फटका बसत होता. पर्यटकांचा देखील हिरमोड होत होता. याच पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करून, ही जंगल सफारी सुरू करण्याची परवानगी वनविभागाकडून देण्यात आली आहे. Melghat Tiger Reserve open for tourists

अमरावती Amravati जिल्ह्यातील मेळघाट बरोबरच राज्यभरातील सर्वच व्याघ्र प्रकल्प हे अनलॉक Unlock होणार आहेत. यामध्ये मेळघाट बरोबरच पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधेरी प्रकल्प, चंद्रपूर Chandrapur, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा प्रकल्पातील पर्यटन Tourism सुरू करण्यात व जंगलसफारी सुरू करण्यास वनविभागाने हिरवा झेंडा दाखवल्याने आता वन्यजीव प्रेमी व पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. विदर्भाचा काश्मीर असलेले चिखलदरा आता पर्यटक यायला सुरुवात झाली आहे.

हे देखील पहा-

राज्यभरातील अनेक पर्यटक या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. चिखलदऱ्यातील भीमकुंड पॉईंट वरील मुख्य धबधबा Waterfall हा अलीकडच्या काळात प्रभावित झाला आहे. देवी पॉईंट जवळील धबधबा हा सुद्धा ओसंडून वाहू लागला आहे. तसेच डोंगरदऱ्यातून वाहणारे छोटे, मोठे धबधबे हे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी हजेरी लावून, या निसर्ग सृष्टीचा मनसोक्त आनंद आता पर्यटकांना लुटता येणार आहे. Melghat Tiger Reserve open for tourists

दरवर्षी पावसाळ्यात इतर ठिकाणच्या तुलनेत चिखलदारामध्ये पाऊस हा सर्वाधिक होत असतो. यंदाच्या पावसाळ्यात विदर्भाचा कश्मीर असलेल्या चिखलदरात तब्बल १७५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरवर्षी येथे पंधराशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस होतो. पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची गर्दी ही सर्वाधिक राहते. पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी १ लाखांपेक्षा जास्त पर्यटक चिखलदारा मध्ये दाखल होत असतात.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Signs of brain tumor: मेंदूमध्ये तयार होत असलेल्या गाठीला कसं ओळखाल? शरीरात दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

SCROLL FOR NEXT